आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ९० च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रेचे (Sonali Bendre) नाव घेतले जाते. आपल्या शानदार कारकिर्दीत अभिनेत्रीने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. सोनालीच्या आयुष्यात नवीन वळण तेव्हा आले जेव्हा तिला २०१८ मध्ये हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान झाले. गंभीर आजाराचे निदान होताच अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागला होता. (Sonali Bendre, Cancer, New York)

कर्करोग फस्ट स्टेजवर असल्याचे कळल्याने त्यावर योग्य वेळी उपचार होऊ शकला. पण हा काळ सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. उपचारानंतर अभिनेत्री खूप मजबूत झाली आहे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ४७ वर्षीय अभिनेत्रीने खुलासा केला की तिचा पती गोल्डी बहल आणि ती अनेकदा कर्करोगाच्या आधी आणि नंतर घडलेल्या गोष्टींबद्दल बोलत असतात.

तिने सांगितले की, या प्रक्रियेतून गेल्यानंतर अभिनेत्रीने बरेच काही शिकले आहे. आपण गोष्टींमधून शिकत नसल्यास हे एक मोठे दुःख आहे. हे एक ध्येय नसून एक महत्त्वाची प्रक्रिया आहे याची आठवण करून देणारा तो क्षण आहे. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिच्या शरीरात झालेले बदल हे तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले.

अभिनेत्रीने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरीरावर २३-२४ इंच खोल जखमा होत्या. अभिनेत्री म्हणते की, डॉक्टरांना शस्त्रक्रियेनंतर २४ तासांनी तिला घरी पाठवायचे होते, कारण त्यांना भीती होती की अभिनेत्रीला काही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. याच कारणामुळे डॉक्टर तिला सतत घरी सोडण्याबद्दलच्या सूचना देत असे.
अनेक अडचणींनंतर ही अभिनेत्री एक सशक्त स्त्री म्हणून समोर आली आहे. ती लवकरच अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. सोनाली बेंद्रेची ‘द ब्रोकन न्यूज’ ही वेबसिरीज लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर ही अभिनेत्री पहिल्यांदाच सीरीजमध्ये दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयुष्मान खुरानाच्या पत्नीने सांगितले बेडरूम सीक्रेट; म्हणाली, सेक्स
भावाला गमावल्यानंतर आता रवी किशन यांच्या आईला झालाय कॅन्सर; दु:ख व्यक्त करताना म्हणाले
या अभिनेत्रीने कॅन्सरवर केली मात, सहा तास चालली शस्त्रक्रिया; म्हणाली, प्रार्थना करणं बंद करू नका
पतीला झालेल्या कॅन्सरविषयी अभिज्ञा भावेने दिली मोठी अपडेट; भावूक होत म्हणाली