Share

पुन्हा लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न करणार सोनाली कुलकर्णी; स्वत:च खुलासा करत म्हणाली..

Sonalee Kulkarni

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. कारण सोनालीने मागच्याच वर्षी प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बांधली होती. तर आता ती पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त समोर येताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु हे खरे आहे.

सोनाली कुलकर्णी खरोखरच पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. दुबईत तिचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तिच्या या लग्नाबाबत माध्यमात जोरदार चर्चा सुरु आहे. तर आता स्वतः सोनालीने तिच्या लग्नाबाबत एका माध्यमाशी बोलताना खुलासा केला आहे. यावेळी माध्यमातील वृत्तांना दुजोरा देत ती पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगितले आहे.

सोनाली कुलकर्णी मागच्या वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बांधली होती. परंतु, या लग्नात सोनाली किंवा कुणालचे आई-वडिल उपस्थित नव्हते. कोरोनामुळे अवघ्या चार लोकांच्या उपस्थितीत त्यांना रजिस्टर मॅरिज करावं लागलं होतं. तर व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे दोघांच्या आई-वडिलांनी या लग्नसोहळ्यात उपस्थिती लावली होती.

त्यामुळे आता सोनाली आणि कुणाल पुन्हा एकदा कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या ७ मे रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने ते दोघे पुन्हा विधीवत लग्न करणार आहेत. तर दुबईत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोनालीने सांगितले की, ‘मागच्या वर्षी कोरोनामुळे आमचं दोनवेळा लग्न रद्द झालं होतं. त्यामुळे आम्ही ७ मे २०२१ रोजी रजिस्टर मॅरिज केलं. त्यावेळी मी आणि माझा नवरा दोघंच उपस्थित होतो. आणि आमचे आई-वडील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमच्या लग्नसोहळ्यात उपस्थित झाले होते’.

सोनालीने पुढे म्हटले की, ‘पण आम्हाला विधीवत लग्न करायचं होतं. मी तेव्हाही म्हटलं होतं की, जेव्हा सर्वकाही सुरळीत होईल तेव्हा पुन्हा सर्व विधी करू. त्यामुळे विधीनुसार माझं पहिल्यांदाच लग्न होत आहे आणि शेवटचं होणार. विधी करण्यामागे आमच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या बातम्या देऊन आमच्या भावना दुखवू नये’, अशी विनंतीही तिने यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या :
लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने दिला ‘AMMA’ चा राजीनामा; म्हणाला, निर्दोष सिद्ध होईपर्यंत..
पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट
अनुष्का-विराटने शिकवलं खुल्लम खुल्ला प्रेम कसं करायचं, पहा व्हायरल झालेले १० रोमँटिक फोटो  

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now