मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पण ही पोस्ट शेअर करणे सोनालीला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. कारण या पोस्टमुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर सोनालीने तिची पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली. पण तिच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनालीने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ‘न आणि ण, श आणि ष, ळ आणि ड, चांदणीमधील च आणि चंद्रामधील, जहाजामधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणार्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्चा!!!’
सोनालीने तिच्या या पोस्टद्वारे अशुद्ध मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांवर भाष्य करत त्यांच्यावर टोमणा मारला. ही गोष्ट काही नेटकऱ्यांना मात्र रूचली नाही. त्यामुळे त्यांनी तिच्यावर सडकून टीका केली. व्याकरणाच्या चुका काढणाऱ्या सोनालीनेच त्या चुका केल्याचे काही नेटकऱ्यांनी तिच्या निदर्शनास आणून दिले.
सोनालीने तिच्या पोस्टमध्ये ‘कळणाऱ्यांना’ ऐवजी ‘कळणार्यांना’ असे शब्द लिहिले. त्यावरूनही तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर सोनालीने तिची ही पोस्टच डिलीट करून टाकली. सोनाली पोस्ट डिलीट करण्यामागचे नेमके कारण समोर आले नाही. पण तिच्या या पोस्टसचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत. या स्क्रीनशॉटवरूनही सोनालीला ट्रोल करण्यात येत आहे.
यादरम्यान, सोनालीच्या या पोस्टवर किरण माने यांनीही कमेंट केल्याचा एक स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये किरण माने सोनालीच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलेले दिसत आहे की, ‘उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रॉलीवरबी नाचायचं.. आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरं नव्हं’.
कमेटंमध्ये पुढे लिहिलेले आहे की, ‘अस्सल सातारीत बोलनाऱ्या, कायम ण ला न म्हन्नाऱ्या आमच्या लाडक्या राजांच्या वाढदिवसाला परवा-परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम… या नट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी इचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची’.
महत्त्वाच्या बातम्या :
महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘या’ अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले…
बॉलीवूडची बोल्ड ब्युटी मल्लिका शेरावतने शेअर केले सोशल मिडीयाला आग लावणारे फ़ोटो; पाहून थक्क व्हाल
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या.., रितेश देशमुखने पावनखिंड चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक