अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मनोरंजन सृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहते सतत तिच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. विशेष बाब म्हणजे तिचा खास चाहतावर्ग आहे. यामुळे सोनालीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या दररोजच्या अपडेट्स देत असते.
काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णी आपल्या पतीसोबत मेक्सिकोला हनिमूनला गेली होती. तिने सोशल मीडियावर मेक्सिकोच्या एका बीचवरील फोटो शेअर केले होते. तेव्हा सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा आपल्याला पाहायला मिळाल्या. सोनालीच्या बिकीनी लूकने अनेकांना वेड लावलं.
यामध्ये सोनालीच्या बिनधास्त बिकिनी लुकने सर्वांनाच चकित केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सोनालीने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पुन्हा सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवारासमोर लग्नगाठ बांधली आहे. कारण सोनालीने गेल्यावेळी लॉकडाऊनमुळे अगदी सध्या पद्धतीने कोर्ट मॅरिज केलं होतं.
आता सोनालीने सासरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून नक्कीच तुम्हाला सोनालीच एक वेगळं रूप पाहायला मिळेल. मराठमोळी, बोल्ड या रूपात पाहिलेली अप्सरा एक सुगरण देखील आहे. हे तुम्हाला फोटो पाहून लक्षात येईलच. सोनालीने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ बनवला आहे.
ते फोटो तिने नेहमीप्रमाणे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. सोबत तिने या फोटोला हटके पोस्ट देखील दिली आहे. “सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर”, असं सोनालीने फोटो शेअर करत लिहिले आहे. हे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेडेकरसोबत पुन्हा लग्न केलं. यापूर्वी लॉकडाउनमध्ये त्यांचं लग्न झालं होतं. दुबईत झालेल्या या लग्न सोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णीचे आई-वडील देखील या लग्नाला उपस्थित नव्हते. तिच्या आई-वडिलांनी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. ७ मे रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने त्या दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
पुणे हादरलं! प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या बाळाला कोंबलं शौचालयाच्या भांड्यात