Share

Sunny Deol: सनी देओलला वाढदिवसाच्या दिवशी मुलाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, मी तुम्हाला वचन देतो की..

अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) त्याचा 65 वा वाढदिवस इतक्यातच साजरा केला आहे. दीर्घकाळ पडद्यावर राज्य करणारा सनी देओल सध्या लाइम लाईटपासून दूर आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच सनी देओल राजकारणातही सक्रिय आहे. सध्या तो पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदारही आहेत. सनी देओलच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा मुलगा करण देओलने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. Sunny Deol, Khasdaar, Birthday, Range Rover, Karan Deol

सनी देओल करोडोंचा मालक आहे. रिपोर्टनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती 12-16 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय रुपयात ते सुमारे 120 कोटी होते. सनीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे चित्रपट. याशिवाय सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून खासदार आहे. सनी देओलकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. सनी देओलकडे रेंज रोव्हर आणि ऑडी ए8 ए आहे.

सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त त्याचा मुलगा करण देओलने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करणने एक भावनिक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये करणने लिहिले की, माझे संपूर्ण जग तुझ्याभोवती फिरते. या जगात माझे पहिले पाऊल ठेवण्यापासून ते चित्रपटसृष्टीत माझे पहिले पाऊल टाकण्यापर्यंत तुम्ही माझे मार्गदर्शक आहात. आयुष्याच्या या प्रवासात तुम्ही मला फक्त सिनेमातच नाही तर आयुष्यासाठीही मार्गदर्शन केलंस.

19 ऑक्टोबर 1956 रोजी पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेल्या सनीने ‘घायल’, ‘जीत’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘बॉर्डर’ आणि ‘गदर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करण म्हणाला की, तुम्ही तुमच्या कलेशी आणि चाहत्यांशी किती खरे आहात याचे मी नेहमीच कौतुक केले आहे. तुम्ही साध्य केलेल्या बिंदूपर्यंत मला नेणारी कोणतीही शिडी नाही, पण मी तुम्हाला अभिमान वाटेल असे काही करेल याच वचन देतो. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सनी देओल, धर्मेंद्र आणि बॉबी देओल त्यांच्या पुढच्या ‘अपने 2’साठी तयारी करत आहे. यासोबतच सनी देओल बाप चित्रपटातही दिसणार आहे. सुर्या, गदर-2 आणि अपने-2 हे सनीचे आगामी चित्रपट आहेत. सनी या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सनी देओल स्वतःचा व्यवसायही करतो. वादापासून दूर राहणार्‍या सनीची छबी रागीट तरुण अशी असेल, पण स्वभावाने तो एकदम शांत दिसतो.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now