कलर्स मराठी वाहिनीचा नुकताच पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून या पुरस्कार सोहळ्याचे अनेक कलाकार मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे यावर्षीचा ‘लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा’ पुरस्कार अभिनेता वरद चव्हाणला प्रदान करण्यात आला आहे. ‘आई मायेच कवच’ या मालिकेतील भास्करच्या भूमिकेसाठी वरदला हे पारितोषिक देण्यात आले आहे.
यानंतर त्याने या पुरस्काराचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत आता बाबा हवे होते… अशी भावूक पोस्ट लिहली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी आज खरच विजय चव्हान असायला हवे होते असे म्हटले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, मला १०, १२ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर मिळालेली ही पहिलीच पोचपावती आहे.
आज खरच बाबा असायला हवे होते… पण त्यांनी हा क्षण पाहिला असेल याची मला पूर्ण खात्री आहे. मी माझ्या या प्रवासात माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो. वरदने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
वरद एक सुप्रसिद्ध अभिनेता असला तरी तो विनोदी दुनियेचा राजा असणाऱ्या विजय चव्हान यांचा मुलगा आहे हे खास करुन कोणालाच माहित नाही. ज्यावेळी वरदने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते तेव्हा तु माझ्या ओळखीवर पुढे जाऊ नकोस असा सल्ला विजय यांनी आपल्या मुलाला दिला होता.
तसेच या क्षेत्रात येणारे यश अपयश तुझ्या एकट्याचे आहे असे विजय यांनी वरदला सांगितले होते. यानंतर त्यांचा हा सल्ला ऐकून वरदने आपल्या कामाला सुरुवात केली. आज तो एक उत्तम अभिनय करणारा कलाकार आहे. त्याने आपल्या अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान विजय चव्हान यांच्या मृत्यूला अनेक वर्षे लोटून गेली आहेत. मात्र तरी देखील आज ही ते प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या अभिनयाने विनोदी वृत्तीने प्रेक्षकांना नेहमी मनोरंजित केले आहे. विजय यांनी वहिनीची माया, झपाटलेला, अशी असावी सासू, माहेरची साडी, आली लहर केला कहर, पछाडलेला, जत्रा, भरत आला परत, मुंबईचा डबेवाला, श्रीमंत दामोदर पंत. अशा विविध चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
अभिनेता विल स्मिथने ऑस्करच्या मंचावरच निवेदकाला चोपले; पत्नीचा अपमान सहन झाला नाही
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन
एक कॅचने पळवला हातातोंडातील घास, ‘त्या’ खेळाडूने पुढच्या आठ चेंडूत सामनाचं पलटवला
पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला; सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत पोहचल्याने घडली दुर्घटना