मध्य प्रदेशात वडील-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाने फेसबुकवर मारेकरी शोधून काढला आणि त्याच्या वडिलांच्या हत्येचा कट रचला. पोलिसांच्या सांगण्यानुसार ही घटना २१-२२ जुलैच्या रात्री घडली.
मारेकऱ्याने महेश गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. ते घरातील एका खोलीत झोपले असताना त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि बिहारच्या भाडेकरूसह तिघांना अटक केली आहे.
शिवपुरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला. यावेळी महेश यांचा मुलगा अंकित गुप्ता संशयाच्या भोवऱ्यात आला. घटनेच्या वेळी तो घराच्या खालच्या मजल्यावर झोपला होता.
पोलिसांनी अंकितची कसून चौकशी केली असता त्याने बिहारमधून एका गुंडाला बोलावून वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये त्याचा मित्र नितीन लोधी आणि गँगस्टर अजित सिंग यांचा समावेश आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, मृत महेश गुप्ता हे शिवपुरी येथील पिछोर याठिकाणी राहत होते.
गुप्ता यांच्या पत्नीचे सुमारे 20 वर्षांपूर्वी निधन झाले असून ते आपल्या मुलासोबत राहत होते. गुप्ता यांचा लष्करात असलेला दुसरा मुलगा अनिल गुप्ता याने आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती.
याशिवाय गुप्ता यांना पेन्शनही मिळत होते. या पैशांवर अंकितची नजर होती. याच पैशाच्या लालसेपोटी त्याने हा गुन्हा केला. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे. पैशांसाठी आपल्या जन्मदात्या बापालाच मुलाने संपवल्याने अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Viral video: …अन् चेस खेळताना रोबोटने तोडली चिमुकल्याची बोटं, व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
आमदार खासदार तर पळवलेच पण आता बाळासाहेबांच्या जुन्या साथीदारांवरही शिंदेंनी टाकला गळ
सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार; किंमतीमधील वाढ पाहून डोळे पांढरे होतील
हाच तो महाराष्ट्र बाणा, हाच तो ठाकरी बाणा; कठीण परिस्थितीशी लढायला आनंद दिघेंचा पुतण्या ठाकरेंसोबत