बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे आपल्या व्यवसायिक जीवनासोबतच खाजगी जीवनामुळे ही प्रसिद्ध असतात. यामध्ये अनेक कलाकारांचा नंबर लागतो. तर या यादीत सर्वात अगोदर बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानचा लागतो. सलमान हा आपल्या चित्रपटामुळे तर चर्चेत होताच. पण याच्या व्यतिरिक्त तो त्याच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत होता.
सलमानचे आता वय वर्ष ५६ असून अजूनही त्याने लग्न केले नाही. मात्र त्याचे अनेक अफेअर हे लग्नापर्यंत पोहचले होते. तसे पाहायला गेले तर, सलमान हा संगीता बिजलानीसोबत लग्न करणार होता. पण या दोघांच्या नात्यात सोमी अलीने एंट्री मारली. त्यामुळे संगीता आणि सलमानचे लग्न तुटले. सोमी १९९४ मध्ये सलमानसोबत लग्न करण्याच्या हेतूने भारतात आली होती.
त्याप्रमाणे तिने सलमानला प्रपोज केले. इतकेच काय तर सलमानही त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर हे दोघेही ८ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या दरम्यान सलमानची ऐश्वर्यासोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला.
सलमान आणि ऐश्वर्याने पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या येण्यामुळे सोमी सोबतचे त्याचे रिलेशनशिप कायमचा तुटले. असे सोमीला देखील वाटत होते. इतकेच काय तर सोमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “सलमान आणि माझे रिलेशनशिप ऐश्वर्यामुळे तुटले.”
त्याचबरोबर सोमीने मुलाखतीत पुढे सांगितले होते की, “सलमानसोबत लग्न करण्याचे माझे स्वप्न होते. मी त्याचा एक चित्रपट पाहिला होता. त्याच रात्री मला त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पडले. मी उठले आणि सर्वत्र सुटकेस शोधू लागले. मी माझ्या आईला ही सांगितले की, मला भारतात जायचे आहे. एका अभिनेत्याशी लग्न करायचे आहे.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “हे ऐकून आईला राग आला, पण नंतर मी तिची समजूत काढली. त्यावेळी मी १६ वर्षांची होते. पण त्याने मला फसवले आहे. सलमानपासून दूर राहणे माझ्यासाठी चांगले आहे.” तसेच ‘लस्सी विथ लविना’ या टीव्ही शोमध्ये तिने सलमानचे हृदय सोन्याचे असल्याचे सांगितले होते.
याच दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देत ती म्हणाली होती की, “सलमानला डेट केले याबाबत मला कसलाही पश्चाताप होत नाही. मी सलमान आणि त्याच्या कुटुंबाकडून खूप काही शिकले. सलमान आणि त्याच्या कुटुंबाने मला शिकवले की, तुमचा धर्म आणि संस्कृती काहीही असो, एक चांगला माणूस असणे महत्त्वाचे आहे.”
त्याचबरोबर सोमीने भारतात आल्यानंतर मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ती मियामी, अमेरिकेला परत गेली. तसेच तिने हे देखील स्पष्टपणे सांगितले होते की, “मी बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात गेले नव्हते. तर माझे सलमानवर प्रेम होते. त्यामुळे मी सलमानच्या शोधात भारतात गेले.”