राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विविध मुद्यांनी वातावरण तापलं आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut)आणि भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya)यांच्यातील वाद नेहमीच पहायला मिळत असतो. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत दिवसेंदिवस नवनवीन आरोप केल्याचं पहायला मिळत आहे.
संजय राऊतांनी सोमय्यांना नवीन वादात खेचलं आहे. त्यांनी सोमय्यांविरोधात आणखी नवीन आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात ट्विट्सची मालिका पुन्हा एकदा सुरू केली आहे.
किरीट सोमय्या यांनी मोतिलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रूपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असे संजय राऊत म्हणाले आहेत. आज मात्र संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केला आहे.
NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला.2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले! pic.twitter.com/YhSOIRJYyB
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2022
किरीट सोमय्या यांनी NSEL ची 5600 कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे घोटाळ्याची मागणी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली असता स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते.
2018-19 असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतिलाल ओसवाल कडून लाखो रूपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असं ट्वविट संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी गेल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्यांविरोधात ट्विविटरवर आरोपांची मालिका सुरू केली आहे.
संजय राऊत यांनी मुख्यत्वे किरीट सोमय्या निगडीत युवक प्रतिष्ठानला येणाऱ्या निधीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानावर सलग आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्यानी सरकारचे आभार मानले पाहिजे’
संगीत क्षेत्रातून आणखी एक दुःख बातमी; प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं निधन
भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष, राष्ट्रवादीने साथ सोडल्यामुळे केली भाजपशी युती