जम्मू आणि काश्मीर सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील कारागिराची हत्या केलेल्या अतिरेक्याचा या ४ जणांत समावेश आहे. (soldiers last message a call to stop fighting over religion)
दु:खत बातमी म्हणजे भारतीय लष्करामध्ये हवालदार म्हणून सेवा बजावत असणारे ३७ वर्षीय अल्ताफ अहमद हे काश्मीरमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनात बर्फाखाली अडकले आणि शहीद झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अहमद यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
तसेच मिनुपाटे येथे वाढलेल्या अल्ताफने विराजपेट येथील सेंट अॅन स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विराजपेट शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आर्मी ऑर्डनन्स कोअर रेजिमेंटमध्ये दाखल झाली. १९ वर्षांपासून ते यात काम करत होते.
बुधावरी ३७ वर्षीय अल्ताफ अहमद हे काश्मीरमध्ये शहीद झाले. अल्ताफ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्यांनी पाठवलेला शेवटच्या काही व्हॉइस मेसेजेसपैकी एक शेअर केलाय. या मेसेजमध्ये अल्ताफ लोकांना एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचं आवाहन करत आहेत.
सध्या हा मेजेस सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतं आहे. अल्ताफ यांनी व्हाइस नोटमध्ये सांगितलं की, ‘हिजाब आणि भगवा यासाठी वाद घालू नका. अशा गोष्टी पाहिल्यावर आम्हाला त्रास होतो. देशातील सर्वच नागरिक ही भली माणसं असून आपण सर्वजण भारतमातेची मुलं आहोत याच विचाराने आम्ही इथे ड्युटीवर असताना विचार करतो. आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका अशी विनंती करतो.’
तसेच पुढे ते म्हणतात, “सुखरुप राहा. धर्म आणि जातीच्या नावाने भांडू नका. तुम्ही सुरक्षित रहावं म्हणून आपले सैनिक येथे (काश्मीरमध्ये) तैनात असून प्राणांची बाजी लावत आहेत. देशाबद्दल विचार करा आणि तुमच्या मुलांनाही हेच शिकवा,” असे अल्ताफ यांनी म्हंटले आहे. दरम्यान अल्ताफ यांचा हा मेसेज वाचताना सर्वांच्याच डोक्यात अश्रु येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी, मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का?; उद्धव ठाकरे संतापले
परीक्षेत कॉपी केली म्हणून मैत्रिणींसमोर वडिलांनी झाप झाप झापलं; 13 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल..
जिओ फायबरला मात देण्यासाठी ‘या’ कंपनीचा जबरदस्त प्लॅन, अर्ध्या किंमतीत इंटरनेट सेवा
‘गंदी बात’ वेब सिरीजमधील ‘ही’ अभिनेत्री कपडे काढून आली कॅमेऱ्यासमोर, काढले सगळ्यात बोल्ड फोटो