पती – पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीनेच पतीची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पत्नीला बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
ही घटना हरणायातील दादरीच्या किशनपुरातील आहे. मृत भारतीय सेनेत जवान होता. तो सुट्टीवर घरी आला असताना पत्नीने त्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण सेनेत २२ सिग्नल रेजिमेंट मेरठमध्ये हवालदार पदावर तैनात होता. पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढला, तसेच याबाबत तपसादरम्यान आणखी देखील बाबी समोर आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिक पती ड्यूटीवर जाण्याच्या एक दिवसआधी त्याला पत्नीने झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि नंतर गळा आवळून त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याला दादरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
धक्कादायक बाब म्हणजे, ५ फेब्रुवारीला संशयास्पद स्थितीत प्रवीणचा मृतदेह आढळून आल्यावर परिवाराने त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक सांगितलं होतं. कुटुंबातील व्यक्तीने पोलिसांना सांगितलं होतं की, रात्री तो जेवण करून झोपला होता आणि सकाळी उठला तेव्हा त्याला चक्कर येत होत्या.
त्यानंतर पाच फेब्रुवारीला राजकीय सन्मानात प्रवीणवर अंत्यसंस्कार करण्यात आला. पण प्रवीणच्या मृत्यूच्या एक आठवड्यानंतर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ उडाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आलेल्या महितीने पोलिसही चक्रावून गेले. प्रवीणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि त्याचा श्वास गुदमरल्याने झाला असल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. हत्येसंबंधी पत्नी मोनिका हिची चौकशी केली असता, तिने कबूल केले की, तिचा मित्र विक्कीच्या मदतीने पतीच्या हत्येचा प्लान केला होता. त्या प्लान नुसार पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि रात्री उशीरा दोघांनी मिळून प्रवीणचा गळा दाबला. सध्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आपल्या आख्ख्या पिढीची कमाई नाही एवढी किंमत आहे अंबानींच्या सुनेच्या लेहंगा आणि ज्वेलरीची; असा होता सुनेचा विवाहातील ‘रॉयल लूक’
ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे सर्वच पैसे हारला; उचललं टोकाचं पाऊल अन्…, सुसाईड नोटने खळबळ
आता किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढल्या, मुलाच्या अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धावपळ
आलिया भट्टने कंगना राणावतच्या ‘पापा की परी’ कमेंटवर दिले सडेतोड उत्तर, दिले थेट ‘भागवत गीते’चे ज्ञान