Share

मुलीच्या बलात्काराचा फौजी पित्याने असा घेतला बदला, न्यायालय आणि पोलीस बघतच राहिले

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठार मारत बदला घेतला आहे. गोरखपूर न्यायालयाच्या आवारात मुलीच्या वडिलांनी आरोपी दिलशाद हुसेनवर गोळ्या झाडल्या आहेत. यात आरोपी दिलशादचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी न्यायालयाजवळ असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निवृत्त लष्करी जवानाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.(soldier-father-take-revenge-in-court-police-only-see)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बलात्काराचा आरोपी दिलशाद हुसेन हा त्याच्या वकिलाच्या फोनवरून न्यायालयात आला होता. तेथे बलात्कार पीडितेचे वडील भागवत निशाद यांनी दिलशाद हुसेनच्या डोक्यात परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडली, त्यात तो जागीच ठार झाला.

मयत झालेला आरोपी दिलशाद हुसेन हा गोरखपूरच्या बधलगंज येथील पटनाघाट तिराहा येथे निवृत्त लष्करी जवान भागवत निशाद यांच्या घरासमोर पंक्चरचे दुकान चालवत होता. त्याचे वय २५ वर्ष होते. दिलशानच्या दुकानाच्या शेजारीच निवृत्त लष्करी जवानाच्या घरचे बांधकाम सुरु होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिलशादने निवृत्त जवानाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते.

त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी निवृत्त लष्करी जवान भागवत यांनी दिलशानवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, १२ मार्च २०२१ रोजी पोलिसांनी दिलशादला हैदराबाद येथून अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या आरोपी दिलशादची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक विपिन टाडा यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आवारात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून हल्लेखोराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिलशाद हुसेन हा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी असून तो एका खटल्यासाठी गोरखपूर न्यायालयात आला होता. या घटनेनंतर वकिलांनी न्यायालयाच्या आवारात या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली. तथापि, नंतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक अखिल कुमार यांनी आंदोलकांना शांत केले आणि या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या :-
फडणवीसांचा पर्रिकरांना डावलण्याचा निर्णय फसला, बाबूश मोन्सेरात ‘या’ प्रकरणात अडकले
नागपूरात १०० रूपये तिकीटात बघायला मिळतोय महीलांचा नग्न डान्स; राज्यात खळबळ, विरोधी पक्ष आक्रमक
डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाऊन संशोधन करण्याचा मार्ग मोकळा, स्वत: शिक्षणमंत्र्यांनीच दिले निर्देश

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now