Share

solapur : सोलापूरच्या आजोबांनी ४६ वर्षांत केले ८५ लग्न, कारण वाचून बसेल धक्का

marriage

solapur man married 85 times in 46 years  | लग्नाचा क्षण हा प्रत्येकासाठी खूप खास क्षण असतो. कारण बऱ्याच लोकांच्या जीवनात तो एकदाच येणार असतो. पण काही लोक हे दोन-तीनदा सुद्धा लग्न करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने एक दोन नाही तर तब्बल ८५ लग्न केले आहे.

अबू अब्दुल्ला असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अबू अब्दुल्ला हे मध्य प्रदेशातील रहिवासी असून ते मूळचे सोलापूरचे आहे. त्यांचे वय सध्या ६० वर्षे असून गेल्या ४६ वर्षांमध्ये त्यांनी तब्बल ८५ लग्न केले आहे. ही गोष्ट सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी असली तरी त्यांना याचे काहीच विशेष वाटत नाही.

अबू यांचे पहिले लग्न झाले तेव्हा त्यांचा संस्कार खूप सुखी होता. त्यांना मुलंही झाली. पण नंतर त्यांच्यात वाद होत गेले आणि अखेर अबू अब्दुल्ला यांनी दुसरे लग्न केले. त्यांची पहिली पत्नी ही ६ वर्षांनी मोठी होती. त्यांनी दुसरे लग्न केले तेव्हा त्यांची पहिली पत्नीही सोबत राहत होती.

अशात दोन्ही पत्नी सोबत राहत असल्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊ लागली. त्यांच्या त्रासापासून सुटका म्हणून त्यांनी तिसरे लग्न केले. त्यानंतर चौथं लग्नही केलं. पण त्याचं पटत नसल्यामुळे त्यांनी पहिल्या तीन बायकांना घटस्फोट दिला.

अशात अबू हे काही महिने सौदी अरेबियामध्येही राहिले होते. तिथे त्यांना महिलांशी संबंध ठेवावे लागायचे. पण लग्न केल्याशिवाय संबंध ठेवणे अबू यांना मान्य नव्हते. त्यामुळे ते लग्न करायचे अशाप्रकारे त्यांनी जवळपास ८५ लग्न केली. त्यांचं एक लग्न तर फक्त एका रात्रीचं होतं.

८५ लग्न मजा किंवा शरीर संबंध ठेवण्यासाठी केलेले नाही. सुखी संसार ठेवण्यासाठी केले होते. मी त्या व्यक्तीचा शोध घेत होतो जी मला आनंदी ठेवेल आणि समजून घेईल. माझी पत्नींसोबतची वागणूक चांगलीच होती, असे अबू अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
virat kohli : भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी विराटने घेतला मोठा निर्णय; BCCI ला सांगीतलं सुद्धा नाही
gautami patil : गौतमी पाटीलची लावणी कायमची बंद पडणार? पहिला कार्यक्रम झाला रद्द; जाणून घ्या नक्की काय घडलं
‘आदित्य ठाकरेंना सोडणार नाही, त्याने दिशा सालियनवर अत्याचार केले, त्याला तुरूंगात पाठवणारच’

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now