court reject petition against atul avtade | गेल्या आठवड्यात सोलापूरच्या एका तरुणाने जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले होते. त्यांच्या या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्या तरुणाचे नाव अतुल आवताडे आहे.
या तरुणाने एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी लग्न केले होते. अशात एकाचवेळी दोन तरुणींशी लग्न केल्यामुळे त्याच्याविरोधात अकलूजमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही गुन्हा दाखल करत हे प्रकरण कोर्टात नेले होते. पण आता सोलापूर न्यायालयाने अतुलला मोठा दिलासा दिला आहे.
अतुलची चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली होती. पण न्यायालयाने ती परवानगी नाकारली आहे. कलम १९८ अंतर्गत न्यायालयाने अतुलची चौकशी नाकारली आहे. संबंधित व्यक्ती हा पीडित कुटुंबातील सदस्य नाही. तो तिसऱा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याची दखल घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे या प्रकऱणात अतुलवर कुठलीही कारवाई होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अतुलसोबत लग्न करणाऱ्या दोन तरुणींचे नाव रिंकी आणि पिंकी आहे. त्या दोघेही जुळ्या बहिणी आहे. त्या दोघेही मुंबईच्या रहिवासी आहे. त्या लहानपणापासून सोबतच वाढल्या आहे.
लहानपणापासून सोबत असल्यामुळे त्यांनी एकाच व्यक्तीला आपला साथीदार म्हणून निवडले. दोघींनी एकाच तरुणाच्या गळ्यात लग्नाची माळ घातली. पण दुसऱ्याच दिवशी अतुल विरोधात अकलूज पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
माळेवाडी येथे राहणाऱ्या राहूल फुले याने पोलिस अतुलविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहिता १८६० कलम ४९४ नुसार अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला. कलमानुसार पती पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करता येत नाही.
तसेच हिंदु विवाह कायद्यानुसार एका पुरुषाने दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार अतुलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण न्यायालयाने आता चौकशी करण्याचे आदेश नाकारले आहे. पत्नीने तक्रार केली नाही, ही तक्रार तिसऱ्या एका व्यक्तीने केली आहे. त्यामुळे याची दखल घेतली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
anurag kashyap : दक्षिणात्य चित्रपटांचे यश बॉलिवूडला पचेना? अनुराग म्हणाला, कांतारा बनवला पण पुढचे चित्रपट हे…
vasant more : अखेर वसंत मोरेंच्या नाराजीचे खरे कारण आले समोर; म्हणाले माझ्या विरोधातील कट कारस्थान…
vasant more : मी स्मशानभूमीत जाईल, पण मनसेच्या कार्यालयात जाणार नाही; वसंत मोरे संतापले