सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून नक्कीच तुमच्याही काळजाचा ठोका चुकल. सोलापूर-पुणे महामार्गावरील मडके वस्ती जवळ भरधाव कंटेनरने चिरडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
वैष्णवी संतोष सरवदे असं या मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी अवघ्या 23 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी सध्या बीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती सोलापूरमधील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. तर जाणून घ्या नेमकं घडलं काय..?
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॉलेजमधील काम संपवून घरी जाण्यासाठी दुचाकीने (एम. एच. 13 डी. के. 6109) निघाली होती. मात्र पुढे काळाने घाला घातला आणि वैष्णवीचा मृत्यू झाला. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तिच्या गाडीला अपघात झाला.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, मडके वस्ती नजीक मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एम. एच. 46 ए. आर. 6188) वैष्णवी हिच्या दुचाकीला धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे कंटेनरने वैष्णवीला सुमारे 10 ते 15 फूट पर्यंत फरपटत नेले. यात वैष्णवीच्या डोक्याला जबर इजा झाली.
याचच वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. ‘आई कॉलेजमधील काम संपले आहे मी घरी निघाले आहे,’ असं वैष्णवीने आईला फोन करून सांगितलं होतं. मात्र रस्त्यावरच वैष्णवीवर काळाने घाला घातला. मृत वैष्णवीच्या पश्चात वडील, एल. एच. पी. कंपनीत कामास आहेत. आई गृहिणी आहे तर एक लहान भाऊ असा परिवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
KGF 2 ने OTT चेही रेकॉर्ड मोडले, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले डिजिटल हक्क
राणांच्या विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले
एकमेकींच्या प्रेमात वेड्या झाल्या तरुणी, पोलिस ठाण्यात पोहचून घातला हायव्होल्टेज ड्रामा
खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली सारा तेंडुलकर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा फोटो