Share

अनुपम खेरच्या सावत्र मुलासोबत सोहेलचे झाले होते कडाक्याचे भांडण, झाली होती मारामारी, वाचा किस्सा

ही गोष्ट 17 वर्षे जुनी आहे. त्यावेळी अनुपम खेर (Anupam Kher) यांचा सावत्र मुलगा सिकंदर खेरने (Sikander Kher) बॉलीवूडमध्ये पाऊलही ठेवले नव्हते, तेव्हा वांद्रे येथील एका पबमध्ये त्याची भेट फिल्म इंडस्ट्रीतील ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खानच्या भावाशी झाली. तिथे सोहेल खानसोबत त्याचे जोरदार भांडण झाले. सोहेल खान आणि अश्मित पटेल यांनी मिळून सिकंदरला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण इतके वाढले होते की, अनुपम खेर यांना तक्रारही दाखल करावी लागली होती. अखेर असे काय झाले की या दोन सिनेतारकांनी एकमेकांना मारण्याचा निर्णय घेतला होता! चला जाणून घेऊया.(Sohail had a heated argument with Anupam Kher’s step-son)

सिकंदर खेर आणि सोहेलच्या या भांडणाला 17 वर्षे उलटून गेली तरी लोक हे भांडण विसरू शकलेले नाहीत. 2005 मध्ये मुंबईतील वांद्रे येथील एका पबमध्ये पार्टी सुरू होती. आवाज घुमत होता. लोकं नाचत होते, मजा घेत होते. या पार्टीला सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि अनुपम खेरचा सावत्र मुलगा सिकंदर खेर देखील उपस्थित होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्टीदरम्यान नशेच्या अवस्थेत सिकंदर खेरने सोहेल खानसमोर त्याचा भाऊ सलमान खानवर अश्लील टिप्पणी केली. ही गोष्ट सोहेलला आवडली नाही आणि त्याने त्याच वेळी उत्तर दिले आणि प्रकरण पुढे गेले. सिकंदरच्या या कमेंटमुळे सोहेल चांगलाच संतापला आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. तिथे उपस्थित असलेला अभिनेता अश्मित पटेल देखील या भांडणात सामील झाला आणि नंतर हे भांडण वाढत गेले.

ashmit patel

तो दिवस आणि आज इतक्या वर्षांनंतरही सोहेल खान आणि सिकंदर खेर यांच्यात सर्व काही ठीक झालेलं नाही, असं म्हटलं जात आहे. त्या भांडणानंतर आजपर्यंत दोघेही एकत्र दिसले नाहीत. कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. त्यांच्यात हे अंतर अजूनही कायम आहे. त्यावेळी अश्मित पटेलने या भांडणात उडी घेतली होती, पण नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. या भांडणानंतर अश्मितची अशी प्रतिमा निर्माण झाली की तो भांडखोर आणि पार्ट्यांमध्ये नेहमीच भांडत राहतो. यावर अश्मितने एका मुलाखतीत सांगितले होते की, ही अभिमानाची गोष्ट नाही. हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही आणि ते नंतर माझ्या लक्षात आले.

वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, अनुपम खेर यांनी सोहेल खान आणि अश्मित पटेल यांच्या विरोधात त्यांचा मुलगा सिकंदर खेर यांना मारहाण केल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, दुसरीकडे सोहेल खानने या सर्व अफवांचे खंडन करत असे काही झाले नसल्याचे म्हटले आहे. त्याने सिकंदरला आपला मित्र असल्याचे सांगितले.

सिकंदर खेरबद्दल बोलायचे झाले तर त्याने फार कमी चित्रपटात काम केले आहे, पण त्याचा अभिनय चांगला आहे. त्याने 2008 मध्ये वुडस्टॉक व्हिलामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. 2020 मध्ये तो सुष्मिता सेनसोबत ‘आर्या’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यानंतर तो 2021 मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत ‘सूर्यवंशी’मध्येही तो दिसला होता.

सिकंदर खेर हा अभिनेत्री आणि राजकारणी किरण खेर यांचा मुलगा आहे. अनुप खेर हे त्याचे सावत्र वडील आहेत. किरण खेरचे पहिले लग्न गौतम बेरीशी झाले होते, पण नंतर ती अनुपमच्या प्रेमात पडली आणि तिने पुन्हा लग्न केले. मात्र, अनुपम आणि सिकंदरचे नाते खूपच सुंदर आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यात अनुपम आणि सिकंदर एकमेकांशी विनोद करताना दिसत आहेत. अनुपम यांनी सिकंदरला केवळ दत्तकच घेतले नाही तर त्यांचे आडनावही दिले.

अनुपम खेरची आई दुलारी अनेकदा सिकंदरच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की सिकंदरचे प्रेम होते. 2016 मध्ये सोनम कपूरची चुलत बहीण प्रिया सिंहसोबत त्याची एंगेजमेंट निश्चित झाली होती, पण 6 महिन्यांनंतर हे नाते तुटले. असे अनेक प्रसंग येतात जेव्हा खेर कुटुंबात सिकंदरच्या लग्नाची चर्चा रंगत असते.

महत्वाच्या बातम्या-
मी त्यांना भीक मागायला सोडू शकत नाही; म्हणत अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित कुटुंब घेतले दत्तक
सलाम! अनुपम खेर यांनी या काश्मिरी पंडित कुटुंबाला घेतलं दत्तक, मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलणार
काश्मीर फाइल्सवर सलमान खानने सोडले मौन, अनुपम खेर यांना फोन करत म्हणाला
अनुपम खेर यांचे काश्मिरबाबतचे ते ट्विट पुन्हा व्हायरल, म्हणाले होते, हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now