Share

…तर तुम्ही माझ्यासोबत येणार ना? थेटच विचारत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला सुचक इशारा

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीडमध्ये भाषण देत होत्या. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यांनी केलेल्या विधानाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील साद देत सोबत राहण्याचं आश्वासन दिलं आहे. पंकजा मुंडे यांच्या सोबत राहण्याची कार्यकर्त्यांनी घोषणा केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, संघर्षासाठी माझा पाठीचा कणा कधीही वाकत नाही. झुकून गंभीर होऊन घरी बसणारा पैकी मी नाही. माझ्याबरोबर तुम्ही आहेत ना, मी उजव्या बाजूला गेले तर डाव्या बाजूला गेले तर वर गेले तर खाली गेले तर माझ्या सोबत आहेत ना, असा सवाल कार्यकर्त्यांना केला.

तसेच म्हणाल्या, संघर्षाला मी घाबरत नाही, संघर्षाचा वसा माझ्या रक्तातच आहे. संघर्ष केल्याशिवाय नावच होत नाही. सध्या चर्चा कुणाची आहे. संघर्षाची चर्चा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी घणाघात केला. तसेच मी थकणार नाही मी रुकणार नाही, असे मुंडे म्हणाल्या.

म्हणाल्या, मुंडे साहेबांच्याही वाट्याला पराभव आला होता. तो पराभव माझ्या देखील वाट्याला आला. त्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जोपर्यंत मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझा बाल हि बाका होणार नाही. तिरंगी लढत झाली असती तर सीट लागली असती, असे मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, माझ्याबरोबर तुम्ही आहेत ना, मी उजव्या बाजूला गेले तर डाव्या बाजूला गेले तर वर गेले तर खाली गेले तर माझ्या सोबत आहेत ना, असे पंकजा यांनी विचारले असता कार्यकर्त्यांनी साद देत आम्ही तुमच्या सोबतच राहणार अशा घोषणा दिल्या.

सध्या, शिंदे फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान दिलं नाही त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज परळीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबाबत होत असलेल्या चर्चेला उत्तर दिलं आहे.

म्हणाल्या, माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, माझ्या नाराजीच्या बातम्या पेरू नका. मी नाराज नाही. पण कोणत्या कार्यकर्त्याला वाटत नाही की त्यांचा नेता मोठं व्हावा. प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता नाराज होतच असतो. मी माझी ताकद नेहमीच पक्षाला दिली. आज माझ्याकडे काही नाही. लोकांना वाटलं माझी ताकद कमी झाली. त्यामुळे लोक माझ्या पाठीशी आहेत, अशा मुंडे म्हणाल्या.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now