Share

….तर आम्ही एकनाथ शिंदेंनाही सोडणार होतो; शहाजीबापूंचा खळबळजनक गौप्यस्फोट

शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बंडखोरीनंतर सुरत पासून ते गुवाहाटी आणि गोवा मुंबई यामध्ये शिंदेंची असणारी परिस्थिती त्यांनी सांगितली आहे.

आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अजिबात शत्रू मानू नये. त्या माणसांनं उरावर धोंडा ठेवून हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे कितीवेळा रडलं. सूरतमध्ये रडलं, गुवाहाटीमध्ये दोनदा रडलं. मुंबई सोडल्यापासून सूरतपर्यंत रडतच होते.

म्हणाले, आमच्यासोबत असणाऱ्या एका आदिवासी आमदाराने सांगितलं की, एकनाथ शिंदे हे मुंबई सोडल्यापासून सूरतपर्यंत रडतच होते. काय बोलतं नव्हते. पण, ‘निर्णय घ्या नाही तर तुम्हालाही सोडून आम्ही निघाले,’ अशी हट्टाची भूमिका आम्ही घेतली होती.

त्यावेळी आम्ही शिंदेंनाही सोडलं असतं, पण आम्ही शिवसेनेत थांबत नव्हतो. शिवसेनेत आम्ही मरायला लागलो होतो. काय करता शिवसेनेत राहून, असा मोठा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी सुरत, गुवाहाटीमध्ये घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.

म्हणाले, निर्णय घेण्यासाठी आम्ही ४० ते ४२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. बहुधा हा निर्णय घेण्यासाठी त्यांचे मन तयार होत नव्हते, त्यामुळेच मुंबई ते सूरत या प्रवासादरम्यान कोणाशीही न बोलता सतत रडत होते, असे पाटील म्हणाले.

म्हणाले, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असा माणदेशी भाषेतील माझा संवाद एवढा गाजेल असे मलाही वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरेही या संवादावर बालले, तो माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा अपमान आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही.

महाराष्ट्रात जन्माला का आला, हे उद्धव ठाकरेंचे विधान काळजाला भिडून गेलं. माझ्या त्या संवादात मी माझ्या मायभूमीविषयी काही बोललोच नाही. आसाममधील निसर्गसौंदर्याचे मी वर्णन केले, त्यात काही चूक नाही. ते राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता आसामवर बोलणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.

ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, नेमके काय बोलायचं आणि सांगायचं याच गोष्टीचं यांना सध्याच्या या रागीट, चिडखोर स्वभावात भानं राहिलं नाही, असे मी समजतो. तसेच म्हणाले, शरद पवारांनी आग्रह धरल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे आता सांगत आहेत. शिवसेनेचे प्रमुख तुम्ही होता की शरद पवार होते, असा त्यांनी सवाल करत ठाकरेंवर टीका केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now