Share

..म्हणून आम्ही शिवसेना फोडली; मोदींनी पहील्यांदाच दिली जाहीर कबुली, कारणही सांगीतले

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दुभंगल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं.

दुसरीकडे बिहारमध्येही मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला आहे. नितीश कुमार यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावाही केला. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज दुपारी २ वाजता होणार आहे. अशावेळी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सुशील मोदी म्हणाले, नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलात जो मान मिळणार नाही तो त्यांना भाजपसोबत असताना मिळाला होता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधीही केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं.

म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत. अशा शब्दात सुशील मोदी यांनी शिवसेना फोडल्याबाबत वक्तव्य केलं आहे.  महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर पहिल्यांदाच एखाद्या भाजप नेत्यानं असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

सुशील मोदी यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज १० ऑगस्टला दुपारी २वाजता बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन होणार आहे. शपथविधी पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now