मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावरून ते शिवसेना नेमकी कोणाची या संदर्भात निकाल या संदर्भात निकाल या सुनावणीमध्ये लागणार आहे.
त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. असे असताना या निकालाच्या दोन दिवस आधीच जेष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उल्हास बापट यांनी थेट महाराष्ट्रातील सरकार पडण्यापर्यंतची शक्यता व्यक्त केली आहे. उल्हास बापट यांनी टीव्ही ९मराठीला दिलेल्या मुलाखतीत २७ तारखेच्या शिंदे गटाबद्दल सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे.
२७ तारखेला सर्वोच्च न्यायालयानमध्ये शिवसेना कुणाची यावर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा दसरा मेळाव्यासंदर्भातील निकाल या पार्श्वभूमीवर महत्वाचा वाटतो का?असा प्रश्न बापट यांना यावेळी विचारण्यात आला.
यावर बापट म्हणाले, एका अर्थाने हा निकाल महत्वाचा आहे. २७ तारखेला शिवसेना कोणाची ठरणारच आहे. तोपर्यंत कदाचित स्टे ऑर्डर मिळू शकेल असं काही घटना तज्ज्ञांचं मत आहे, असे बापट दोन दिवसांपूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.
तसेच म्हणाले, २७ तारखेच्या खटल्याची भारतातील काही मोजक्या महत्वाच्या १०-२० खटल्यांमध्ये नोंद होईल. २८राज्यं आहेत, प्रत्येक राज्यात राज्यपाल आहेत. पक्षांतर होत आहेत. एकदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं पाहिजे की राज्यपालांचे अधिकार काय आहे? असे बापट ठाकरे विरुद्ध शिंदे सुनावणी संदर्भात म्हणाले.
बापट म्हणाले, सर्वांत महत्वाचं म्हणजे हा जो दहाव्या शेड्युल खालील पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यानुसार पक्षांतर झालं आहे की नाही? हे न्यायालयाला ठरवावं लागेल. तसेच म्हणाले,१६ लोक आधी बाहेर पडले, पण १६ लोक म्हणजे दोन तृतीयांश नाही हे उघड आहे.
विलिनिकरणाचं जे कलम दिलं आहे दहाव्या शेड्युलमध्ये त्यात दोन तृतीयांश बाहेर पडावे लागतात आणि त्यांचं विलिनिकरण व्हावं लागतं, असे बापट म्हणाले. मात्र शिंदे गटासंदर्भात हे दोन्हीही झालं नाही याकडे बापट यांनी लक्ष वेधलं.
बापट यांनी स्पष्ट सांगितले की, १६ जर का अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कायद्यानुसार मंत्रिपदावर राहताच येणार नाही. शिंदे सरकार पडेल असे बापट म्हणाले. आता बापट यांनी केलेलं विधान किती खरं ठरते हे आजच्या निकालानंतरच समजेल.