मद्रास हायकोर्टाने आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पत्नीच्या बाजूने निकाल दिला आहे. कोर्टाने पतीवर कडक टीका केली आहे. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने पतीला घर सोडण्याचे सांगितले आहे.
पतीचे घर सोडून घरगुती शांतता राखता येत असेल , तर न्यायालयाने तसे आदेश द्यावेत असे कोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, पतीकडे राहण्यासाठी दुसरे घर किंवा पर्याय नसला तरी त्याला पत्नी पतीला घराबाहेर काढू शकते.
न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, पतीने घरात पत्नीसोबत हिंसाचार केला आणि ही त्याची रोजची सवय असेल, तर त्याला पत्नी घरातून हाकलून देऊ शकते. मद्रास हायकोर्टाने ११ ऑगस्ट रोजी घरात शांतता राहावी यासाठी पत्नीच्या बाजूने निकाल देत ही सुनावणी केली.
घरगुती वादाशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना, न्यायमूर्ती आर एन मंजुळा यांनी आदेश देताना सांगितले की, आरोपी पती घरगुती हिंसाचार आणि शिवीगाळ करण्यापासून थांबत नसेल तर ‘घरगुती शांतता’ पूर्ववत करण्यासाठी त्याला घराबाहेर काढले जाऊ शकते.
ज्या महिला घरात पतीच्या उपस्थितीमुळे घाबरतात त्यांच्याबाबत न्यायालयांनी त्याच्याबाबत उदासीन राहू नये. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये महिलांच्या संरक्षणासाठी दिलेले आदेश व्यावहारिक असले पाहिजेत, असे मद्रास न्यायालयाने म्हटले आहे.
या महत्त्वाच्या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती आर.एन.मंजुळा यांनी पीडित पत्नीच्या पतीला दोन आठवड्यांत घराबाहेर पडावे लागेल, असे आदेश दिले. जर पती घराबाहेर पडत नसेल तर, तर त्याला घराबाहेर काढण्यासाठी पोलिस पाठवले जातील असेही न्यायालयाने सांगितले.