Share

…तर त्यांना रस्ता मोकळा आहे, शिवसेनेपाठोपाठ हा पक्षही सोडणार भाजपची साथ? अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर

सध्या अग्निपथ भरती योजनेला सर्वत्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलने होत आहेत. अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये देखील तणाव पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नितीश यांचा संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधील संबंध देखील बिघडत असल्याचं दिसत आहे.

अग्निपथ भरती योजनेवरून बिहारमध्ये सध्या सर्वाधिक तणाव आहे. गेल्या चार दिवसांपासून हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक रेल्वे गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. बसेस फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बिहारमध्ये नितीश यांच्या संयुक्त जनता दलासह भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. मात्र आता रोज बिहारमध्ये होत असणाऱ्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचं चित्र दिसत आहे.

बिहारमध्ये अग्निपथ योजनेवरून जे काही दंगे होत आहेत, त्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यानंतर आता प्रकरण टोकाला जात असताना दिसत आहे. गृहमंत्रिपद नितीश कुमार यांच्याकडेच असल्यानं भाजप नेते संयुक्त जनता दलावर निशाणा साधत आहेत.

त्यातच भाजपचे नेते आणि मंत्री नीरज कुमार सिंह बबलू यांनी एक विधान केलं की, एनडीए सोडण्यासाठी कारण शोधत असलेले लोक एनडीए सोडू शकतात. त्यांच्यासाठी रस्ता मोकळा आहे. त्यांच्या या विधानामुळे आता दोन्ही पक्षातील वातावरण अधिक खराब होताना दिसत आहे.

नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या रेणु देवी, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरांवर नुकतेच हल्ले झाले. त्यानंतर भाजप नेत्यांनी नितीश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यावर जदयूकडून ललन सिंह आणि उपेंद्र कुशवाहा यांनी पलटवार केला. यावर पुन्हा एकदा भाजपचे मंत्री नीरज कुमार बबलू यांनी उत्तर दिलं.

बबलू यांनी संयुक्त जनता दलाला सुनावलं. म्हणाले, प्रत्येकाच्या मनात काही ना काही सुरू आहे. कोणताही बहाणा करून कोणाला जायचं असल्यास इथं कोणी त्यांचा पाय पकडून ठेवलेला नाही. मनात कोणताही बहाणा असेल तर त्यांना रस्ता मोकळा आहे. युती दोघांच्या सहमतीनं चालते, असे म्हटलं. या सगळ्या घडामोडींवरून शिवसेनेपाठोपाठ आता संयुक्त जनता दल देखील भाजपची साथ सोडणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now