शरद पवार(Sharad Pawar): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती.
सत्तांतरणानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने शिंदे फडणवीस सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. आदित्य ठाकरे, जयंत पाटील, यांनीही जोरदार टीका केलेली आहे. आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते की, फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जायला नको होता, पण दुर्दैवाने तो गेला.
महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळेच सर्वाधिक गुंतवणूक व्हायची. आता केंद्रात सत्ता असल्यामुळं प्रकल्प गुजरातला मिळाला असेही ते म्हणाले. आता आरोप प्रत्यारोप बंद करून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने कामाला लागलं पाहिजे. नवीन सरकारचे काम मला अजूनही दिसले नाहीत. गेलेल्या प्रकल्पाचा विचार करून आता काय अर्थ. पुढील कामाला सुरवात झाली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
आता त्यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. पुढे काय करायचं ते बघायला पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले, प्रकल्प तळेगावात जाणार होता. तळेगाव हिच प्रकल्पासाठी योग्य जागा होती. पण प्रकल्प गुजरातला गेला हे दुर्दैव. शिंदे आणि सामंत महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, तरी ते आता आरोप करत आहे. त्यांच्या या आरोपाला काही अर्थ नाही.
फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाचे आमिष दाखवणे म्हणजे काय समजावं? हे तर असं झालं रडणाऱ्याला मोठ्या फुग्याच आमिष दाखवण्यासारखं. पुढे ते म्हणाले, सगळी यंत्रणा थंड पडली आहे का? असा प्रश्न मनात येतो. आता टीव्ही लावला की, फक्त काय झाडी, काय डोंगर हेच दिसत आहे. राज्याच्या प्रमुख लोकांनी राज्याच्या हिताचा विचार करायला हवा. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोदींनी मदत केली तर स्वागतच आहे.
शिंदेच्या गणेश दर्शनावरही टीका करत ते म्हणाले, राज्यप्रमुख अगदी गतीने सगळीकडे जात आहे. त्याचप्रमाणे कामातही गती यायला हवी. पुढे भाजपच्या लोकसभा मिशन ४५ वर बोलताना ते म्हणाले की, बारामतीत केंद्रीय मंत्री येतात ही चांगली गोष्ट आहे, सीतारामन यांची भाषा बारामतीतील जनतेला सहज समजेल. महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
Asad Rauf : क्रिकेटचे पंच असद रऊफ यांचा भयानक शेवट; शेवटच्या दिवसातील अवस्था वाचून येईल डोळ्यात पाणी
Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा
Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार
Audio clip : पोलीस इन्सपेक्टरने मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह गरळ ओकली; आॅडीओ क्लिप व्हायरल, मराठे आक्रमक