जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता थायलंड सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. थायलंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच यापुढे महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर चाप बसेल.
थायलंड सरकारने महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतला आहे. लैंगिक गुन्हेगारांना शिक्षेत घट करायची असेल तर नपुंसक होण्याचे इंजेक्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. थायलंड सरकारने घेतलेल्या या निर्णयाची जगभर चर्चा होत आहे.
थायलंड सरकारने आणलेल्या या विधेयकावर कायदेशीर मंजुरी मिळणं अजून बाकी आहे. कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर लैंगिक गुन्हे कमी करण्यासाठी हा निर्णय अंमलात आणला जाईल. यामुळे नक्कीच लैंगिक गुन्हे कमी होण्यास मदत होईल असा विश्वास सरकारला आहे.
तुरुंगातून बाहेर यायचे असेल किंवा शिक्षेत कपात हवी असेल तर स्वेच्छेने नंपुसकत्वाची औषधे घेण्याचा पर्याय सरकारने दिला आहे. कनिष्ठ सभागृहाने मार्चमध्ये मंजूर केलेले विधेयक सोमवारी उशिरा १४५ सिनेटर्सनी मंजूर केले. मात्र अद्याप दुसर्या हाऊसकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. २०१३ ते २०२० दरम्यान थायलंडच्या तुरुंगातून सुटका झालेल्या १६,४१३ दोषी लैंगिक गुन्हेगारांपैकी ४,८४८ जणांनी पुन्हा गुन्हा केल्याचे सुधारणा विभागाच्या आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे.
थायलंडमध्ये तुरुंगातून सुटून आलेले पुन्हा गुन्हा करताना आढळून आले आहे. अशा गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी थायलंड सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने आता नराधमांना तुरुंगातून सुटून बाहेर येताना त्यांचे नपुंसकत्व केले जाणार आहे.