shivsena : २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील पेचप्रसंगावर सुनावणी पार पडली. त्यादरम्यान घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेच्या या प्रकरणावर निवडणूक आयोगाला यापुढे निर्णय घेण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अथवा त्यांना निर्णय घेण्यापासून रोखण्याचा देखील अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही, असे मत अनेक घटना तज्ञांनी देखील नोंदवले होते.
सुनावणी वेळी शिंदे गटाकडून घटनापीठासमोर हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी घटनापीठानेही हे मान्य केले. आता यापुढे निवडणूक आयोग नेमका अधिकृत पक्ष कोणता? हे चिन्ह कोणाकडे जाणार? याबाबत निर्णय घेऊ शकते. मात्र त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया यापुढे होईल. याबाबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी माध्यमांशी बातचीत केली. त्यांनी पुढीप्रमाणे काही मुद्दे स्पष्ट केले.
यानंतर निवडणूक आयोग शिंदे गट व शिवसेनेकडून उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्यासाठी सांगेल. त्यांचे दावे ऐकून घेतले जातील. त्यानंतर कोणत्या गटाकडे किती खासदार, आमदार, पदाधिकारी आहेत? हे पाहिले जाईल. पक्ष कार्यकारणीत देखील बहुमत कोणाच्या बाजूने आहे? हे देखील तपासून पाहिले जाईल. यामध्ये सर्व सदस्यांची शिरगणती करून नोंद घेण्यात येईल. त्यामुळे या प्रक्रियेत साधारण तीन-चार महिने तरी जातील. निवडणूक आयोग बहुमत कोणाच्या बाजूने आहे. हे देखील तपासून बघेल.
माध्यम प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर शिवसेनेचे नाव व चिन्ह वापरता येऊ शकते का? याबाबत विचारले. त्यावर उत्तर देताना कुरेशी म्हणाले, या निर्णय प्रक्रियेदरम्यान कोणती निवडणूक आल्यास आयोग त्या पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवतं. निवडणुकीपुरतं त्या दोन्ही गटांना नाव आणि चिन्ह वापरण्याची मुभा दिली जाते. निवडणुकीपुरतं शिवसेना- ए आणि शिवसेना – बी असं काहीतरी निवडणूक आयोगाकडून दिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरं काहीतरी चिन्ह त्यांना दिलं जाऊ शकतं.
अशा प्रकारे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना कोणतीही निवडणूक आली तरी संबंधित दोन्ही गटांना पक्षाचे चिन्ह आणि नाव वापरता येत नाही, असे काही महत्त्वपूर्ण मुद्दे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
Saamana : ‘आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली’
Supriya Sule : शरद पवारांनी ‘ही’ गोष्ट केली की राष्ट्रवादी लगेच सत्तेत येते; सुप्रीया सुळेंनी फोडले गुपित
Bachhu kadu : “दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती म्हणून…”, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट