बॉलिवूडच्या(Bollywood) आधी सुशांत सिंग राजपूतने टीव्हीमध्ये नाव कमावले होते, एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या शोने त्याला देशभरात घराघरात नाव मिळवून दिले. सुशांत सिंगने ‘काई पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(so-sushant-singh-rajput-wanted-to-have-a-party-at-shah-rukhs-house)
यानंतर त्यानी मागे वळून पाहिले नाही आणि चित्रपटांमध्ये सक्रिय झाला. सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) हा शाहरुख खानचा खूप मोठा चाहता होता हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्याने एकदा मन्नतमध्ये शाहरुखसोबत पार्टी करायची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर किंग खानने त्याला त्याच्या घरच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते, परंतु तुम्हाला माहित आहे का की अभिनेत्याला त्याच्या घरी पार्टी का करायची होती? चला तर मग जाणून घेवूया.
याचा खुलासा खुद्द अभिनेत्यानेच एकदा त्याच्या मुलाखतीत केला होता. 2013 मध्ये आलेल्या सुशांत सिंह राजपूतचा डेब्यू चित्रपट ‘काई पो चे’ च्या यशानंतर अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली होती.
सुशांत म्हणाला होता, ‘मी शाहरुख सर(Shahrukh Khan) आणि त्याच्या चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. मी माझ्या सुरुवातीच्या काळात यशराज बॅनरचे बरेच चित्रपट पाहायचो, ज्यात शाहरुख खानचे चित्रपट जास्त होते. मी किंग खान आणि त्याच्या चित्रपटांचा खूप मोठा चाहता होतो.
एकदा तो आपल्या मित्रांसोबत वांद्रे(Bandre) येथील सरांच्या घराजवळच्या कॉफी शॉपमध्ये बसला होता. त्यांच्या घरी पार्टी होती आणि मोठ्या गाड्या त्यांच्या बंगल्याकडे जात होत्या.
पुढे सुशांत म्हणाला, ‘त्या दिवशी मी स्वत:ला वचन दिले होते की, एक दिवस मी मन्नतला(Mannat)जाऊन त्याच्यासोबत पार्टी करेन. सुदैवाने त्याच वर्षी मला शाहरुख खानच्या घरी ईद पार्टीचे आमंत्रण मिळाले होते. मी खूप आनंदी होतो.’
14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. अभिनेता आता राहिला नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
बॉलिवूडमधील सात वर्षांच्या प्रवासात सुशांत सिंग राजपूतने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘छिछोरे’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा'(Dil Bechara) (2020) होता आणि तो त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक महिन्यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.