हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये आयर्लंडचा चार गडी राखून पराभव केला. भारताने डब्लिन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 (IRE vs IND) मध्ये घरच्या संघासमोर २२५ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं, पण आयर्लंडने शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला.(Umran Malik, Hardik Pandya, Dinesh Karthik, Sanju Samson, Cricket, Players, Batsmen, Bowlers, Captains,T20 )
आयर्लंडच्या फलंदाजांनी सलग चौकारांच्या सहाय्याने लक्ष्य जवळपास गाठले आणि त्यांना विजयासाठी शेवटच्या षटकात केवळ १७ धावांची गरज होती. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्याच्या शेवटच्या निर्णायक षटकात गोलंदाजी करण्यासाठी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची निवड का केली हे स्पष्ट केले आहे.
सामन्यानंतर पंड्या म्हणाला, “मी माझ्या समीकरणातून सर्व दडपण लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मला वर्तमानात राहायचे होते आणि मी उमरानला पाठिंबा दिला. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्या वेगाच्या जोरावर १८ धावा काढणे नेहमीच कठीण जाते. त्याने काही अप्रतिम शॉट्स खेळले, त्याने खूप चांगली फलंदाजी केली, त्याचे श्रेय त्याला दिले जाईल आणि आमच्या गोलंदाजांचा त्यांचा उत्साह कायम ठेवण्याचे श्रेय दिले जाईल.”
२८ वर्षीय कर्णधाराने आयर्लंडमध्ये खेळून भारतीय चाहत्यांचा पाठिंबा मिळवण्याविषयी सांगितले. चाहत्यांचे आभार मानताना पंड्या म्हणाला की, दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसन हे त्याचे आवडते खेळाडू होते कारण चाहते त्याला सर्वात जास्त चियर करत होते.
भारतीय कर्णधार म्हणाला, “चाहते, त्यांचे आवडते खेळाडू दिनेश आणि संजू होते. जगाच्या या कोपऱ्यात अनुभवणे खूप छान आहे. आमच्यासाठी खूप पाठिंबा आहे, आम्ही त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो आणि आशा करतो की आम्ही ते केले. ” तसेच, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.”
तो म्हणाला, ” एका मुलाच्या रुपात देशासाठी खेळणे हे नेहमीच स्वप्न असते. नेतृत्व करणे आणि पहिला विजय मिळवणे हे विशेष होते, आता मालिका जिंकणे देखील विशेष आहे. दीपक आणि उमरानसाठी आनंदी आहे.” सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयर्लंडच्या अँड्र्यू बालबर्नी (६० धावा), पॉल स्टर्लिंग (४० धावा) आणि हॅरी टेक्टर (३९ धावा) यांच्या अव्वल खेळी कामी आल्या नाहीत.
अखेरच्या षटकात भारताने सामना हिसकावून घेतला आणि चार धावांनी विजय नोंदवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना दीपक हुडाच्या १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर २२५/७ धावा केल्या. यासह भारताने ही मालिका २-० ने जिंकली. आपल्या शानदार फलंदाजीने जगातील पहिल्या क्रमांकाच्या टी-२० संघाविरुद्धचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेणाऱ्या आयर्लंडला या मालिकेतही अनेक सकारात्मक गुण मिळाले.
महत्वाच्या बातम्या
काशी विश्वनाथाच्या मंदीरातील साईबाबांच्या मुर्त्यांना महंतांचा विरोध; जाणून घ्या यामागील कारण…
नांगरणी करताना नांगरात अडकले नोटांनी भरलेले पोते; नोटांचा ढिगारा पाहून शेतकऱ्याचे डोळे झाले पांढरे
अधिवेशन बोलावून बहूमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश घटनाबाह्य; घटनातज्ञांनी सांगीतले कारण