Share

..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती

अभिनेता आणि अभिनेत्री हे चित्रपटात कोणत्या पात्राची भूमिका करायची आहे, याची माहिती घेऊन चित्रपटाच्या अभिनयासाठी होकार देतात. काही अभिनय हे विचारसरणीला पटणारे नसतात तरीदेखील आव्हान म्हणून ते संबंधित पात्र स्वीकारण्यास तयार असतात.

असाच काहीसा प्रकार हा अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत घडला आहे. शरद केळकर हा त्याच्या दमदार भूमिकांसाठी आणि त्याहूनही त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. शरद केळकर याने आत्तापर्यंत बहुविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मात्र, आता शरद केळकर यास त्याने स्वीकारलेल्या एका पात्राबद्दल अधिक भीती भेडसावत आहे. त्याला असे वाटत आहे की लोकांनी त्याला या संबंधित पात्राच्या भूमिकेत पाहिले तर त्याला चप्पल देखील मारायला मागेपुढे पाहणार नाहीत. आता एकाएकी या अभिनेत्याला असं का वाटावं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

तर याचं कारण म्हणजे, शरदनं आजवर काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या, मात्र आता त्यानं ‘ऑपरेशन रोमिओ’ या चित्रपटात जी भूमिका केली ती आत्तापर्यंतची सर्वात आव्हानात्मक आणि तितकीच नकारात्मक भूमिका आहे. या स्वीकारलेल्या भूमिकेबद्दल त्याला भीती वाटत आहे.

एका मुलाखतीत त्यानं चित्रपटातील या भूमिकेबद्दल आपलं मत मांडलं आहे. तो म्हणाला चित्रपटाचं कथानक हे सर्वांना आपल्या जवळचं वाटेल असंच आहे. या चित्रपटातील काही दृश्य आपलं कसब पाहणारी होती. मात्र त्यात स्वीकारलेली भूमिका मानसिकदृष्ट्या हादरवून टाकणारी आहे.

तसेच म्हणाला, चित्रपटात असे काही डायलॉग्स आहेत जे पाहून महिला माझा तिरस्कार करु लागतील अशी भीती त्यानं व्यक्त केली. हे पात्र साकारताना मला किळस येत होता. मी स्वत:चाच राग करु लागलो होतो. तिथं घरी जाऊन पत्नी आणि मुलीशी नजर मिळवण्याचंही माझं धाडस नव्हतं.

मला खात्री आहे, की चित्रपट पाहिल्यानंतर लोक मला चपलेनं मारतील. माझी प्रतीमा पूर्णपणे मलिन होईल. पुढे आपली भावना व्यक्त करत म्हणाला, तुम्ही माझी परिस्थिती जाणून घ्या, मी एक पती आहे, 8 वर्षांच्या मुलीचा बाप आहे. खासगी आयुष्यात मी फारच कौटुंबिक व्यक्ती आहे.

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now