Share

..म्हणून मी कधीच मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही, उर्फी जावेदच्या वक्तव्याने जिंकली लोकांची मने

urfi javed

बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ती कधी काय घालून येईल सांगता येत नाही. उर्फी अनेकदा तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. यासोबतच ती बेधडकपणे आपले विचार मांडते. आता उर्फीने आपल्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (So I will never marry a Muslim boy, the statement of Urfi Javed)

उर्फी एका पारंपारिक मुस्लिम कुटुंबातील आहे. परंतु मुस्लिम असूनही तिला स्वतः मुस्लिम मुलाशी लग्न करायचे नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने हा खुलासा केला. उर्फीने पुढे दावा केला होता की, ती कधीही मुस्लिम पुरुषाशी लग्न करणार नाही.

एका मुलाखतीत उर्फी जावेद म्हणाली होती, ‘मी एक मुस्लिम मुलगी आहे. मला आलेल्या सर्वाधिक अश्लील कमेंट्स मुस्लिम लोकांच्या आहेत. मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे, असे ते म्हणतात. ते लोकं माझा तिरस्कार करतात कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या स्त्रियांनी विशिष्ट पद्धतीने वागावे असे वाटते. त्यांना समाजातील सर्व महिलांवर नियंत्रण ठेवायचे आहे. यामुळे मी इस्लामला मानत नाही. त्यांनी मला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे ते जशी माझ्याकडून वागण्याची अपेक्षा करतात तसे माझ्याकडून धर्माचे पालन होत नाही.

उर्फी पुढे म्हणाली, ‘मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लामवर विश्वास ठेवत नाही. मी कोणत्याही धर्माचे पालन करत नाही, म्हणून मला याची काळजीच नाही की, माझं कोणावर प्रेम असेल. मला हवं त्या मुलासोबत मी लग्न करू शकते.

उर्फीने सांगितले की, माझे वडील खूप परंपरावादी होते. मी 17 वर्षांची होते. तेव्हा ते आम्हा भावंडांना सोडून गेले. एकट्या आईने आम्हाला सांभाळले. माझी आई खूप धार्मिक स्त्री आहे, पण तिने कधीच आपला धर्म आमच्यावर लादला नाही. माझे भाऊ आणि बहिणी इस्लामचे पालन करतात आणि मी करत नाही, परंतु त्यांनी कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. तसंच असावं. तुम्ही तुमचा धर्म तुमच्या पत्नी आणि मुलांवर लादू शकत नाही. ते हृदयातून आले पाहिजे, अन्यथा तुम्ही किंवा अल्लाह यावर प्रसन्न होणार नाही.’ असं ती म्हणते.

उर्फी अनेकदा तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा दोऱ्यांचा, बिकिनी स्टाईल ड्रेसमधला फोटो पाहून चाहते घायाळ झाले. सोशल मीडियावर उर्फी जावेदला भरपूर फॅन फॉलोइंग आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुहास कांदेंचे मत बाद करण्यासाठी मुंबईहून दिल्लीला…;अखेर शिवसेनेने बाहेर काढले सत्य, राजकारणात खळबळ
पंतप्रधान मोदींनी देहूत सावरकरांबद्दल थाप मारली; सावकरांच्या लिखाणानेच केली पोलखोल
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now