‘गेल्या अडीच वर्षात २४ तास काम करताना मी बाबांना पाहिलं आहे. कधी कधी तर त्यावरून मी आईशी जाऊन भांडायचो,’ असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी मनमाडच्या मेळाव्यात केलं. उद्धवसाहेब २४ तास लोकांच्या सेवेत कसे व्यस्त असायचे हे त्यांनी सांगितले.c कार्यपद्धतीवर बंडखोर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्या आमदारांचा समाचार घेतल्याचे दिसते. (So I used to go and fight with my mother; Aditya Thackeray told)
बंडखोर आमदारांचा उद्धवसाहेब त्यांना भेटत नाहीत हा मोठा आक्षेप होता. मात्र आदित्य ठाकरे सांगतात की, ‘उद्धव ठाकरे यांनी २४ तास लोकांच्या सेवेसाठी दिले. त्यांच्याकडे कधीच वेळ नसायचा. मला त्यांच्याशी खूप बोलायचं असायचं. परंतु त्यांच्याकडे गेलं की, ते म्हणायचे कामाचं बोल, राज्याचं बोल.’
‘मी एक आमदार, एक मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना त्यांना काम करताना पाहिलं आहे. ते कायम कामात व्यस्त असायचे. मिटिंगमध्ये असायचे. कधीच त्यांच्याकडे वेळ नसायचा. त्यामुळे मी आईशी जाऊन कधी कधी भांडायचो असं ते म्हणाले.’
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांचं काम चांगलं होतं. देशभरातून त्यांच्या कामाचं कौतुक झालं. पण नक्की काय असं झालं की आमदारांनी बंड केला? असा उलट सवालच त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘ उद्धवसाहेबांनी ज्यांना तिकीट दिलं. ज्यांचा प्रचार केला. ज्यांच्यासाठी मेहनत घेतली. त्याच आमदारांनी बंडखोरी करून गद्दारी केली. काहीही आरोप करणाऱ्या त्या गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. तशी त्यांची लायकीच नाही,’ असं बोलत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर हल्ला चढवला.
‘दिवाळीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. तेव्हा मला एका परिषदेसाठी स्कॉटलंडला जायचं होतं. मी बाबांना म्हणालो, बाबा ऑपरेशन आहे. मी स्कॉटलंडला जाऊ की नको? त्यावर उद्धवसाहेब म्हणाले, आदित्य तू माझी काळजी करू नकोस. तू राज्याचा मंत्री आहेस. तू जा..’ हा प्रसंग देखील त्यांनी भाषण करताना शिवसैनिकांना सांगितला.
महत्वाच्या बातम्या-
१५ रुपयांच्या कणसासाठी मंत्र्याने घातली दुकानदाराशी हुज्जत; म्हणाले, केवढं महाग विकतो, पाहा व्हिडीओ
”आदित्य ठाकरे वाघ आहे पण सध्या मटण खाण्याऐवजी वरण भात खातोय”
गद्दारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देणार नाही, तेवढी त्यांची लायकी नाही, आदित्य ठाकरे संतापले