राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’कडुन मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या व म्हणाले, गेली दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे इफ्तार पार्टीच आयोजन करता आले नाही . मात्र,आता परिस्थिती बदलली असुन दोन वर्षानंतर ही संधी पुन्हा मिळाली आहे.
या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, माजिद मेमन यांनीही उपस्थिती लावली होती. या वेळी बोलताना शरद पवार यांनी काही सुचक वक्तव्याही केली.
शरद पवारांनी केलेले सुचक वक्तव्य
ते म्हणाले “अनेक ठिकाणी सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा प्रयत्न होतोय. राजधानी दिल्लीतही असाच प्रयत्न झाला. पण जर महाराष्ट्रात असा प्रयत्न कोणी केला तर हिंदू-मुस्लिम एकत्र येतील आणि कोणालाही तसा प्रकार करु देणार नाहीत”, असा विश्वास ज्येष्ठ नेते,व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले “दिल्लीत केजरीवालांची सत्ता असल्यानं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही खरं तर केंद्राची जबाबदारी आहे. पण महाराष्ट्रात असा प्रयत्न झाला तर हिंदू-मुस्लिम एकत्र येतील आणि कोणालाही तसे करू देणार नाहीत”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
बंधुभाव ठेवा, शांतता ठेवा- वळसे पाटील
काही लोक आपल्यामध्ये असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
अंतिमत: भारतीय ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी- सुप्रिया सुळे
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय एक आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी”
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीवर डाव उलटला! दाऊदच्या माणसाशी पवारांचेच जवळचे संबंध? भाजप नेत्याने पुरावाच दिला
२०१७ मध्येच होणार होती भाजप- शिवसेना – राष्ट्रवादीची आघाडी; भाजप नेत्याचे फोडले बिंग
राष्ट्रवादीवर डाव उलटला! दाऊदच्या माणसाशी पवारांचेच जवळचे संबंध? भाजप नेत्याने पुरावाच दिला
देशाची सत्ता असणाऱ्या अमित शहांना दिल्ली सांभाळता येत नाही हे ‘या’ वरून सिद्ध होते; शरद पवारांची जहरी टिका