Share

..त्यामुळे फक्त पांढऱ्या रंगाच्याच गाड्या चोरायचा, पुणे पोलिसांनी अतरंगी चोराला केली अटक

माणसाला कोणता अजब छंद लागेल, हे सांगता येत नाही. कोणाला गाण्याचा छंद असतो. कोणाला नाचण्याचा छंद असतो. पण पुण्यातील थेरगाव भागातल्या एका तरुणाला चक्क पांढऱ्या रंगाच्या गाड्या चोरण्याचा छंद लागला होता. ह्या अजब प्रकरणाबाबत पुणे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. (..so he used to steal only white cars, Pune police arrested a black thief)

विवेक वाल्मीक गायकवाड (वय २०) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. विवेकला पांढऱ्या गाड्या चोरण्याचा छंद लागला होता. तब्बल ७ गाड्या त्याने पुणे परिसरातून चोरल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मूळचा उस्मानाबादचा असणारा विवेक काहीच दिवसांपूर्वी पुण्यात आला. विवेक कोणतही काम करत नसून तो एक बेरोजगार तरुण आहे. त्याने वाकड, थेरगाव, सांगवी परिसरातील अनेक गाड्या पळवल्या आहे.

विवेकला पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या फिरवण्याची फार आवड आहे. त्यासाठी चक्क त्याने रस्त्यावरील पार्किंगमधील अनोळखी माणसांच्या नवीन गाड्या पळवून फिरवण्यास सुरुवात केली.

तो पार्किंगमध्ये अथवा रोडवर असणाऱ्या गाड्यांना वेगळी चावी लावून फक्त गाडी फिरवण्यासाठी घेऊन जात. गाडीतील पेट्रोल संपले की, पुन्हा ज्या ठिकाणी घेतली. त्या ठिकाणी ती गाडी ठेवून तो निघून जात असे.

मात्र परिसरात वाहन चोरणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याची गोष्ट पोलिसांच्या कानावर पडताच त्यांनी याबाबत शोध घेण्यास सुरुवात केली. चोरट्याला पकडण्यासाठी शक्कल लढवत वेगवेगळ्या पार्किंगमध्ये ट्रॅप लावले. त्यामध्येच विवेकला पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
बिग बुल राकेश झुनझुनवाला आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती सोडून गेले? आकडा वाचून डोळे फिरतील
Ration Card: राशन कार्ड धारकांनो, लक्ष द्या! जर तीन महिने ‘हे’ काम केलं नाही तर कार्ड होणार रद्द, वाचा सविस्तर..
भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यात पोलिसांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो, मुख्यमंत्र्यांचा दावा

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now