राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत. नेत्यांची अनेक व्यक्तव्य समोर येतं आहेत.
शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या माजी मंत्री उदय सामंत यांनी काल काही मोठे गौप्यस्फोट केले. ‘गुवाहाटीला जातानाही मी काही मागच्या दाराने गेलो नाही,’ असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे. सामंत यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
उदय सामंत यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात त्यांच्या गाडीवर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर काल रत्नागिरी येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, गुवहाटीला जाताना मी कळपाने गेलो नाही, मी त्या पन्नासात गेलो नाही. गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो. मी चार दिवस उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना थांबविण्यासाठी विनंती करत होतो, असं देखील सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
दरम्यान, पुढे बोलताना सामंत म्हणाले की, शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर चार दिवस मी राज्यात थांबलो. मात्र पाचव्या दिवशी मी स्वतः सांगितलं की, साहेब आपण कोणी जोडण्याचं काम करत नाहीत. शिंदे यांच्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. म्हणून मलादेखील गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.’
तर दुसरीकडे या कार्यक्रमादरम्यान बोलताना सामंत यांनी ‘ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘या १५ दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावा”, असं आव्हान सामंत यांनी हल्लेखोरांना दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला, महिलेला अचानक जाग आली तेव्हा..
तृप्ती देसाईंना एकनाथ शिंदेंचा निर्णय अमान्य; म्हणाल्या, गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याऐवजी…
Dolo: कोरोनात डाॅक्टर का देत होते डोलो-६५० घेण्याचा सल्ला? १००० कोटींचा घोटाळा आला समोर
Eknath Shinde : गोट्या खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण? सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस
नग्न अवस्थेत तरुण घरात घुसला अन् थेट महिलेशेजारी जाऊन झोपला, महिलेला अचानक जाग आली तेव्हा..
तृप्ती देसाईंना एकनाथ शिंदेंचा निर्णय अमान्य; म्हणाल्या, गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याऐवजी…
Dolo: कोरोनात डाॅक्टर का देत होते डोलो-६५० घेण्याचा सल्ला? १००० कोटींचा घोटाळा आला समोर
Eknath Shinde : गोट्या खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण? सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस