Share

‘चला हवा येऊ द्या’मध्ये येण्याआधी स्नेहलची परिस्थिती खुपच होती बिकट, राहण्यासाठी विकावी लागली होती…

snehal shidam

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने अनेक विनोदवीरांना फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपुर्ण देशात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात आपली कला सादर करत स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. त्यातलीच एक म्हणजे स्नेहल शिदम.

स्नेहलने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात येण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिच्या रंगरुपामुळे तिला समाजातील लोकांकडून हिनवले जायचे. पण तिने नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात मेहनत घेत राहिली. स्नेहलने आता एक विनोदी अभिनेत्री म्हणून राज्यभरात आपलं नाव लौकिक केलं  आहे.

आधी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तु अभिनेत्रीची मैत्रीण, बहिण अशा कोणत्याच भूमिकेत बसत नाही. त्यामुळे आम्ही तुला भुमिका देऊ शकत नाही, अशी अनेक नकार तिने पचवले होते. पण चला हवा येऊ द्या मध्ये येण्याचा तिच्या एका निर्णयाने तिचे संपुर्ण आयुष्य बदलले.

मी का काळी आहे? मी का जाड आहे? याची आठवण जवळचीच माणसं मला करुन द्यायची. त्यामुळे त्या गोष्टींकडे कितीही दुर्लक्ष केले तरी डोक्यातून मात्र त्या जायच्या नाही. पण मेहनतीशिवाय पर्याय नाही हे मला माहिती होती, असे स्नेहलने म्हटले आहे.

स्नेहल ही सामन्य कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे. चाळीत राहूनच ती वाढली. लहानपणापासून तिला अभिनय करण्याची आवड होती. त्यामुळे ती नाटकामध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. घरखर्च चालावा म्हणून स्नेहलची आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाला जायची.

एकदा तर घरात उंदरांनी सगळं अन्न संपवलं होतं. त्यामुळे आता खायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. पण घरही छोटं पडत होतं. त्यामुळे दुसऱ्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्नेहलला आपली बक्षीस विकावी लागली होती.

पुढे कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतरही ती कार्यक्रमात भाग घेत होती. पण तिचे नातेवाईक नेहमीच तिला तिच्या रंगाची आठवण करुन द्यायचे. ऑडिशनच्या वेळी तिला बोलावलं गेलं तर मैत्रिणीची भूमिका शोभणार नाही म्हणत आईची भूमिका कर असे तिला म्हणायचे. पण त्यानंतरही तुला आईची भूमिका शोभणार नाही, असे म्हणत तिला नकार दिला जायचा.

अखेर स्नेहलने चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरलमध्ये येण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमात तिने आपली अभिनयाची कमाल प्रेक्षकांना दाखवली. तिचा अभिनय पाहून प्रेक्षकांनाही ती आवडायला लागली आणि तिचे संपुर्ण आयुष्यच बदलले. त्यामुळे आता तिला अनेक मालिकांमध्ये भूमिका सुद्धा मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! ‘इतक्या’ लाखांच्या पगारावर आता नाही भरावा लागणार इनकम टॅक्स, मोदी सरकार करणार घोषणा
एकेकाळी दारू विकणाऱ्या आसुमलचा आसारामबापू कसा झाला? वाचा जन्मठेप झालेल्या आसारामची कहाणी
३ दिवसात ३ लाख कोटींची राख, हिंडेनबर्गने अदानींची दुनियाच हादरवली; श्रीमंतांच्या टॉप टेनमधून बाहेर

ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now