छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच विवाहबंधनात अडकली. दुबई स्थित बिझनेसमॅन सूरज नांबियारसोबत तिने गुरुवारी (२७ जानेवारी) लग्नगाठ बांधली. गोव्यात दक्षिण भारतीय पद्धतीनुसार दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर येताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान स्मृती इरानी यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मौनीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या (smriti irani wishes mouni roy) आहेत.
स्मृती इरानी आणि मौनी रॉय यांच्यात खास नाते आहे. स्मृती इरानी यांनी स्टार प्लस वाहिनीवरील ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तुलसी विरानी या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. तर मौनी रॉयने या मालिकेत स्मृती यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यामुळे स्मृती यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या ऑनस्क्रीन मुलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टाग्राम हँडलवर स्मृती इरानी यांनी मौनी रॉयच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत लिहिले की, ‘ही मुलगी १७ वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात आली होती. तेव्हा काहींनी दावा केला होता की, ही नवखी आहे. पण ती इतकी चांगली आणि हुशार आहे की, ती खूप सारा प्रेम आणि जिव्हाळा घेऊन आली. भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना ती एक मित्र म्हणून, कुटुंब म्हणून लाभली आहे’.
‘आज ती तिच्या आयुष्यातील नवीन प्रवासास सुरुवात करत आहे. सर्व देवांनी तिच्यावर कृपा करो आणि तिला सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो’. अशा शब्दात स्मृती इरानी यांनी मौनी रॉयला शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी स्मृती यांनी मौनीचा पती सूरजला शुभेच्छा देताना लिहिले की, तु एक नशीबवान माणूस आहेस. तुझ्यावर देवाचा आशीर्वाद असो. खूप प्रेम मौनी रॉय’ .
स्मृती इरानींच्या या पोस्टवर मौनी रॉयनेही कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, ‘खूपच सुंदर शब्द… मी तुमच्या आणि तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. याक्षणी मी तुम्हाला मिस करत आहे’. दरम्यान, स्मृती इरानींची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, मौनीने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, ‘देवों के देव महादेव’ या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘नागिन’ या मालिकेच्या दोन्ही सीझनमध्ये मौनी झळकली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले होते.
मौनीच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास तिने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’, ‘केजीएफ चॅप्टर १’, ‘रोमियो अक्बर वॉल्टर’ आणि ‘मेड इन चायना’ यासारख्या चित्रपटात काम केली आहे. लवकरच ती अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जून मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: उर्वशी रौतेलाने पिंक फ्लोरल बिकीनीवर सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, चाहते म्हणाले, ठंड में आग..
नागिन-६ मध्ये झाली २ हॅन्डसम हिरोंची एन्ट्री, मौनी रॉयसोबत ‘हे’ टिव्ही स्टार्स करणार काम
नागिन ६ मालिकेबद्दल झाला मोठा खुलासा, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भुमिका