धूम्रपान हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण ऐकतो. काही लोक तणाव कमी करण्यासाठी देखील धूम्रपान करतात. तुम्ही धूम्रपान केल्यास त्याचा परिणाम तुमच्या नातवंडांना देखील भोगावा लागू शकतो. याबद्दलचे एक संशोधन सध्या समोर आलं आहे. आजोबा किंवा पणजोबा जर तारुण्यात धूम्रपान करत असतील तर त्यांच्या नातवंडांमध्ये चरबी अथवा वजन वाढते, ही बाब या संशोधनातून उघड झाली आहे.(smoking-dangerous-to-your-grand-childrens)
हे संशोधन युनायटेड किंगडममधील ९० च्या दशकातील ३० वर्षांच्या मुलांवर करण्यात आले आहे. या संशोधनापूर्वी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, प्रजननापूर्वी काही रसायनांच्या संपर्कात आल्याने पुरूषांच्या संततीवर परिणाम होऊ शकतो. नक्की यामध्ये रसायनांचा सहभाग आहे की इतर घटक यासाठी जबाबदार आहेत, याबद्दल संशोधकांमध्ये शंका होती.
पण आता समोर आलेल्या संशोधनामध्ये ही बाब खरी असल्याचे समोर आले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाला आहे. या अहवालात म्हंटले आहे की, जर आजोबांनी त्यांच्या बालपणाच्या तुलनेत तारुण्यपूर्व काळात धूम्रपान सुरू केले असेल, तर त्यांच्या नातवंडांमध्ये जास्त चरबी आढळते.
या अहवालाचे मुख्य संशोधक प्राध्यापक जीन गोल्डिंग यांनी सांगितले की, या अभ्यासात दोन महत्वाचे परिणाम आम्हाला दिसले. पहिला म्हणजे तारूण्याआधी एखादा मुलगा विशिष्ट पदार्थांच्या संपर्कात आला तर त्याच्या पुढील पिढ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरे म्हणजे, मुलांचे वजन जास्त असण्याचे एक कारण म्हणजे त्याचा सध्याचा आहार किंवा व्यायाम यांचा फारसा संबंध नाही. तर त्याच्या पूर्वजांची जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे.
मानवांमध्ये प्रीप्युबर्टल एक्सपोजरच्या परिणामांची तपासणी करण्यासाठी ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी १४००० लोकांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात ज्या स्त्रियांच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी वयाच्या १३ व्या वर्षी धूम्रपान करण्यास सुरुवात केली होती अशा स्त्रियांच्या शरीरात जास्त चरबी आढळली. पण पुरुषांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
२०१४ साली केलेल्या संशोधनात अशी माहिती समोर आली होती की, जर एखाद्या मुलीच्या वडिलांनी वयाच्या ११ वर्षांच्या आधी नियमितपणे धूम्रपान करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मुलींच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त चरबी आढळली. हे नवीन संशोधन याचाच पुढचा भाग आहे. चार पिढ्यांपर्यंत विस्तारित ट्रान्सजनरेशनल प्रभावाचे हे पहिले मानवी प्रदर्शन आहे, असे अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
भन्नाट स्कीम! केवळ पाच हजार रुपयांत घरी आणा हिरोची ब्रॅंडेड इलेक्ट्रिक स्कूटर
खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; मुळशी पॅटर्न पाहून केला खून, आरोपीची पोलिसांकडे कबुली
लहान मुलांची तस्करी, फार्म हाऊसवर मृतदेह पुरलेले; भयानक आरोपांनी सलमान खानची उडाली झोप