स्मिता तांबेच्या मुलीचं झालं बारसं, नवऱ्यानेच शोधलं मुलीसाठी गोंडस नाव, तुम्हालाही आवडेल

मागच्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आई- वडील बनण्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. त्यामध्ये आता मराठीत इंडस्ट्रीतील धाकड अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. (Smita Tambe’s daughter was born, her husband found a cute name for the girl)

स्मिता तांबे आपल्या गोंडस मुलीचे काय नाव ठेवणार? याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता त्या संदर्भात एक माहिती समोर आली आहे. स्मिता तांबेने मुलीचे खूप सुंदर नाव ठेवले. या सुंदर नावाची निवड स्मिताचा नवरा वीरेंद्र द्विदेवी याने केली आहे.

“वैदिका” असे त्या दोघांनी मुलीचे नाव ठेवले. वैदिका या नावाचा अर्थ बुद्धीची देवता असा होतो. तसेच पुराण काळातील एका देवतेचे सुद्धा हे नाव आहे. स्मिताचा पती वीरेंद्रने आपल्या मुलीसाठी हे नाव निवडले.

काही दिवसांपूर्वी स्मिता गरोदर असताना तिच्या खास मैत्रिणींनी तिचे डोहाळ जेवण धुमधडाक्यात केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्मिताच्या मैत्रिणी फुलवा खामकर, अमृता संत, आदिती सारंगधर, रेशम टिपणीस या गर्ल्स गँगने भरपूर धमाल तेव्हा केली होती.

स्मिता मागे एका मुलाखतीत म्हणाली होती की, आम्ही दोघेही आमच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या आयुष्याची ही नवी सुरुवात असणार आहे. त्यामुळे आम्ही दोघे खूप आनंदी आहोत.

स्मिताचे २०१९ ला वीरेंद्र द्विदेवीसोबत लग्न झाले. स्मिता तांबे चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ७२ मैल, जोगवा, देऊळ या सिनेमांमधल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या. कंगना रणौतसोबत पंगा सिनेमात पण तिने काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘उद्धवसाहेबांच्या जागी दुसरा कोण असता तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदाराचे मोठे वक्तव्य
हा तर खऱ्या अशोकस्तभांचा अपमान, नवीन अशोकस्तंभाचे उद्घाटन करताच मोदींवर का संतापले लोक?
महिन्याला ४ वेळा ATM मधून पैसै काढल्यावर पुढच्यावेळी १७३ रुपये कट होणार? वाचा यामागचे सत्य