Share

लहान असो वा मोठा वाघ वाघच असतो! रवि जाधव दिग्दर्शित बाल शिवाजी चित्रपटाचा टिजर रिलीज

सध्या सोशल मीडियावर आगामी ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. दिग्दर्शक रवी जाधव लवकरच हा चित्रपट घेऊन येणार आहेत. चित्रपटाचे भव्य मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले गेले आहे, सध्या त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

नुकतीच दिग्दर्शक रवी जाधव यांनी जून 2022 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास सोनेरी पडद्यावर रेखाटणार आहे.

या चित्रपटाकरिता असोसिएट प्रोड्युसर म्हणून जय पंड्या भूमिका बजावत आहेत. रवी जाधव यांनी चित्रपटाची घोषणा करतेवेळी म्हंटले की, ‘बाल शिवाजी’ चित्रपट तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय प्रवास डोळ्यासमोर उभा करेल. कारण आपल्या शौर्याने देशाला प्रेरणा देणारा हा सर्व काळातील महान राजांपैकी एक आहे. सेल्युलॉइडवर कथन करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आठ वर्षांचे संशोधन लागले.

तसेच म्हणाले, त्यांना 2015 पासून या विषयावर चित्रपट बनवायचा होता. जाधव यांनी गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही कथा सांगितली. ही शौर्यगाथा सांगण्याचे महत्त्व समजून घेतलेल्या संदीपला ही सकारात्मक ऊर्जा मिळाली. भारतावर राज्य केलेल्या महान राजांपैकी एकाचा हा चित्रपट आहे, हा चित्रपट जगभरातील सर्व तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे, भारतातील तीन प्रसिद्ध स्टुडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी आणि वीर बालपणीच्या अकथित कथांवर आधारित अशी प्रतिष्ठित ऐतिहासिक गाथा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट भन्नाट असणार आहे यात शंका नाही.

हा चित्रपट मराठी भाषेसोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात आदर्श शिंदे यांच्या गाण्यांची जोड असणार आहे. एकूणच चित्रपटासाठी होत असलेली मेहनत, आणि हेतू पाहून प्रेक्षक याला पसंती देणार हे नक्की आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now