Share

पुण्यात चौथीतील मुलीने सांगितले आजोबांचे घाणेरडे कारनामे, म्हणाले, मुझे गोद में बिठाकर..

लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण अलीकडे खुपच वाढले आहे. आता नुकतीच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात शाळेत चौथीचा वर्ग सुरू होता. वर्गात शिक्षक गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती देत होते.

यावेळी एका मुलीने तिचे आजोबा तिच्यासोबत कसे घाणेरडे चाळे करतात हे सांगितले. तिचे बोलणे ऐकल्यानंतर शिक्षकांना धक्काच बसला. तिने सगळी हकीकत सांगितली. त्या चिमुकलीला माहितीच नव्हते की तिच्यासोबत इतके दिवस काय घडत आहे.

या प्रकरणी आता कोंढवा पोलिस ठाण्यात ६० वर्षीय आजोबांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. शाळेतील शिक्षीकेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पिडीत मुलगी ही फक्त ११ वर्षांची आहे. कोंढवा परिसरातील एका शाळेत ती शिक्षण घेत आहे.

यादरम्यान शाळेतील शिक्षक गुड टच बॅड टच याबद्दल मुलांना शिक्षण देत होते. यावेळी पिडीत मुलीने डिंसेबरमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून सर्वांना धक्काच बसला. ती पिडीत मुलगी म्हणाली की, जब घर में कोई नहीं होता था तब दादाजी मुझे गोद में बिठाकर आगे पिछे करते थे.

असं सांगत त्या मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. आजोबा त्रास द्यायचे तेव्हा मी ओरडायचे, पण आजोबा माझे तोंड दाबून मला गप्प करायचे. इतकेच नाही तर त्यांनी मला घाणेरडे व्हिडीओही दाखवले असं ती चिमुरडी म्हणाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

नराधम वृद्ध व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिस म्हणाले आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातल्याच व्यक्तीने असं केल्याने कोणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलीच्या आई-वडिलांवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा विचारही कोणी करू शकत नाही.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now