दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा पहिला बॉलिवूड चित्रपट झुंड शुक्रवारी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. जिकडे बघावे तिकडे फक्त झुंडचेच वारे वाहताना दिसत आहेत. सोलापूरात सुध्दा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूरात तब्बल पंधरा – सोळा वर्षांनंतर असे काही घडले आहे की, याची कल्पना कोणत्याच सोलापूरातील व्यक्तीने केलेले नव्हती. पूर्वी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटाचे कट आऊट पध्दतीने फोटो पोस्टर म्हणून लावण्यात येत असत. यात चित्रपटातील दिग्दर्शकांचे फोटो , त्यातील कलाकाराचे फोटो पोस्टर म्हणून लावण्यात यायचे.
परंतु कालांतराने काळ बदला की पध्दत सुध्दा बदलली गेली. यानंतर असे पोस्टर लावणे बंद झाले. मात्र इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच झुंड चित्रपटासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे सगळीकडे या पोस्टरची चर्चा सुरु आहे. सोलापूरात ज्या ज्या ठिकाणी झुंड चित्रपट लावण्यात आला आहे. तेथे नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांचे जुन्या पध्दतीचे पोस्टर लावले गेले आहेत.
त्यामुळे नागराज मंजुळेंनी सुध्दा हे पोस्टर फोटो शेअर करत सोलापूरकरांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अंकाऊटवर या पोस्टरची स्टोरी ठेवली आहे. नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. या चित्रपटाचे कौतुक कलाकार विश्वातील सर्वच व्यक्ती करताना दिसत आहेत.
यात अभिनेता अमिर खान यांची प्रतिक्रिया तर सर्वात जास्त चर्चेत आली आहे. झुंड चित्रपट पाहिल्यांनतर अमिर खानने नागराज मंजुळेसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमिर खान म्हणाला आहे की, चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा तर तुम्ही फुटबॉल केला आहे.
यानंतर त्याने सांगितले की, मी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी मी मराठी चित्रपट का केला नाही यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी म्हणालो की, मला नागराज मंजुळेने विचारलं तर मी नक्कीच करेन. आता अमिर खानने व्यक्त केलेली ही इच्छा सर्वांनी उचलून धरली आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे पडले महागात; मनसे कार्यकर्त्यांनी धिंड काढत दिला चोप
भाजपाचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन, नवाब मालिकांच्या राजीनाम्याची केली मागणी
“महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील सुपुत्रांसाठी किमान एक तरी विमानाचा खर्च उचलावा”