Share

पुण्यातील मटका किंगची हत्या, अवघ्या १२ तासात आरोपींना ठोकल्या बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड

sanjay subhash patole

रविवारी पुणे परिसरातील मटका व्यवसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संजय पाटोळेची हत्या नेमकी कोणी केली? हत्येमागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. (six arrested in pune matka king sanjay subhash patole murder case)

अखेर शिरवळ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. अवघ्या 12 तासात पोलिसांनी मुख्य सूत्रदासह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी मृतदेहाचा पंचनामा करत असताना पोलिसांना मटका किंग संजय पाटोळे याच्या खिशामध्ये पोलिसांना हाॅटेलमध्ये जेवण केलेल्याचे बिल सापडले.

त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. या प्रकरणाच्या तलाशी जाण्यासाठी पोलिस थेट हत्येच्या दिवशी संजय पाटोळेने जेवण केलेल्या हाॅटेलमध्ये पोहचले. त्यानंतर पोलिसांनी हाॅटेलमधील सीसीटीव्ही पाहिले असता पाटोळेसोबत काहीजण जेवण करत असल्याचे दिसले.

दरम्यान, त्यापैकी एकजण मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पुण्यातील विविध भागांतून शस्त्रासह अटक केली. तसेच अवघ्या 12 तासात हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले.

त्यानंतर चौकशीदरम्यान आरोपी तरबेज सुतार आणि मटका किंग संजय पाटोळे याचे पैशाच्या देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हे दोघे एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत होते. यावरूनच तरबेज सुतारने आपल्या साथीदारांच्या मदतीने संजय पाटोळेची हत्या केली, असे चौकशीदरम्यान समोर आले.

दरम्यान, मटका किंग संजय पाटोळे हत्या प्रकरणातील तबरेज मेहमूद सुतार, किरण बबनराव साळुंखे, विकी राजेंद्र जाधव, शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे, नितीश उर्फ नित्या सतीश पतंगे, राकेश सुरेश गायकवाड यांना बेड्या ठोक्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
“वुहानच्या ज्या लॅबमधून कोरोना पसरला त्या लॅबचा मालक बिल गेट्स आहे”
ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी मिळणार नाही, बिले भरावीच लागतील; अजितदादांनी ठणकावले
तुमच्या हक्काचे मुंबईतील घर सोडून जाऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती
नोकरी सोडूून सुरू हा सुपरहिट बिझनेस, आरामात होईल महिन्याला ५ ते १० लाख रुपयांची कमाई

क्राईम इतर राज्य

Join WhatsApp

Join Now