प्रसिद्ध जेष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण आणि न्युमोनियाच्या आजारामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आणि अभिनय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हे लतादीदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
परंतु आता त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी लतादीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देत चाहत्यांना आणि प्रियजनांना भावनिक आवाहन केलं आहे. उषा मंगेशकर याविषयी माहिती देताना म्हणाल्या की लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे परंतु त्यांनी आजारावर अजूनही मात केलेली नाही.
त्यांची प्रकृती स्थिर होत असली तरी त्या कधीपर्यंत घरी परततील हे सांगता येत नाही. रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल हे अजून निश्चित नाही. सगळं काही डॉक्टरांवर अवलंबून आहे. असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, लतादीदींच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट आणि चुकीच्या बातम्या देण्यात येत आहेत.
मी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती करते की त्यांनी चुकीच्या बातम्या देऊ नये, असं आवाहन देखील उषा मंगेशकर यांनी केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणामुळे त्यांनी काही मीडियाबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माहिती दिली. त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी याबाबत बातचीत केली असून त्यांचे अपडेट्स सातत्याने लोकांना देत रहा, लोकांना याबाबत जाणून घ्यायचं आहे, अशा सूचना दिल्या आहेत.
लता मंगेशकर भारतीय संगीत विश्वाच्या एक अविभाज्य भाग आहेत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात झाली होती. आजपर्यंत त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केले आहे. या ‘सुरांच्या राणी’ने अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. वयोमानापरत्वे त्या सध्या संगीत क्षेत्रापासून दूर असल्या तरी, त्यांच्या कलाकृती आजच्या नव्या दमाच्या गायक-गायिकांना भुरळ पडतात. लतादीदींचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. वयाच्या 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, त्या कामानिमित्ताने मुंबईत आल्या. संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
मोदी इतकं खोटं बोलतात की टेलिप्रॉम्प्टरही झेलू शकलं नाही; परिषदेत गोंधळल्यामुळे राहूल गांधींनी लगावला टोला
पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर ३ वर्षे बलात्कार
..आणि एन डी पाटलांनी स्वत:च घोषणा दिली, ‘एन डी पाटील मुर्दाबाद’; वाचा तो खास किस्सा