सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. राजकीय नेत्यांची विजयासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वत्र सभा, रॅलीचे आयोजन केलेले दिसून येत आहेत. यामध्ये कोरोना काळात लोकांचा ‘देवदूत’ म्हणून मदतीस धावून आलेला अभिनेता सोनू सूद देखील सहभागी झाला आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ ३६ सेकंदाचा आहे. पण या व्हिडीओमुळे संपूर्ण पंजाब राजकारणात मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. कारण हा व्हिडिओ अभिनेता सोनू सूदचा आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे राजकीय भविष्य ठरवणारा व्हिडिओ असू शकतो. यामुळे चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात नेतृत्वाचा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. तिला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळाले आहे. याच कारणामुळे सोनू सूदचे देखील काँग्रेस पक्षासोबत संबंध जोडला गेला आहे. त्यात सोनू सूदने दिलेला एक संदेश सध्या खुप व्हायरल होत आहे. ‘बोल रहा पंजाब, अब पंजे के साथ- मजबूत करेंगे हर हाथ’ अशी टॅगलाइन वापरत काँग्रेसने हा व्हिडिओ अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1483065317647691777?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483065317647691777%7Ctwgr%5Ehb_0_8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fthelogicalindian.com%2Ffact-check%2Fsonu-sood-cm-channi-33440
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाने तडकाफडकी निर्णय घेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले होते आणि चन्नी यांच्याकडे या पदाचा पदभार सोपवण्यात आला होता. काँग्रेस पक्षाचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं होता. पदभार दिल्याप्रमाणे चन्नी यांनी अगदीच कमी कालावधीत आपल्या कामाची छापही सोडली आहे. मात्र असे असूनही सोनू सूदच्या संदेशाच्या माध्यमातून त्याच्याकडेच सर्वांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनू सूदने अशा संदेश दिला आहे की, खरा मुख्यमंत्री तोच असतो ज्याला ते पद लोकांमुळे मिळते. त्याला फक्त लोकहित माहिती असते. त्या नेत्याला मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे असे सांगावे लागत नाही आणि तेच खरे नेतृत्व असते असे मला वाटते. तो पुढे असे ही म्हणाला की, बॅक बेंचरमध्येही नेतृत्व करण्याची क्षमता असते. हे लक्षात घेत योग्यता ओळखून एखाद्या व्यक्तीकडे नेतृत्व दिल्यास ती व्यक्ती राज्यात, देशात बदल घडवू शकते. असे म्हणत खरंतर सोनू सूदने चन्नी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
त्याचवरोबर सोनू सूदच्या या संदेशानंतर चन्नी यांची काही व्हिज्युअल्स टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यातून चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच नवज्योतसिंग सिद्धू आणि चन्नी यांच्यात नवा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
याच दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न सिद्धू यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्यांनी मोठे विधान केले होते. यावर उत्तर देत सिद्धू म्हणाले होते की, काँग्रेस हायकमांड नाही, तर पंजाबची जनता पुढचा मुख्यमंत्री ठरवणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसने चन्नी यांना प्रोजेक्ट करणारा व्हिडिओ जारी केल्याने सिद्धू यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.






