बॉलिवूडची सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आई झाली आहे. काजलने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून यामुळे काजलच्या कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर काजलची ही बातमी वेगाने व्हायरल होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार काजल अग्रवाल आणि गौतम किचलूच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तर पहिल्यांदा आई-बाबा झाल्याने काजल आणि गौतम खूपच खूश असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात काजल किंवा गौतमने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर काजल आणि गौतमचा एक फोटो शेअर करत त्यांना मुलगा झाल्याची माहिती दिली. तर या पोस्टवर चाहते आणि अनेक नेटकरी कमेंट करत काजल आणि गौतमला शुभेच्छा देत आहेत.
फेब्रुवारीमध्ये काजलच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. यादरम्यानचे काही फोटो काजलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. या समारंभावेळी काजल लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. यासोबत तिने पारंपारिक दागिने घातले होते. साडी लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.
दरम्यान काजलने बिजनेसमॅन असलेल्या गौतम किचलूसोबत ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले होते. त्यानंतर १ जानेवारी २०२२ रोजी ती नववर्षाच्या निमित्ताने तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर पती गौतमसोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती.
काजलने लिहिले होते की, ‘तर मी जुने विसरण्यासाठी डोळे बंद करत आहे आणि नवीन सुरुवातासाठी डोळे उघडत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. २०२१ या वर्षासाठी खूप आभारी आहे. २०२२ या नववर्षात अधिक हुशारीने, दयाळूपणाने आणि ह्रदयातील प्रेमाने पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
राजकुमार हिरानींच्या चित्रपटात ‘या’ लूकमध्ये दिसणार शाहरुख खान; बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये झाला खुलासा…
VIDEO: श्वेता शर्माने बिकीनीमध्ये मारल्या डिप्स, काळ्या ब्रामध्ये ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा
KGF 2 च्या वादळाने सगळे चित्रपट झोपवले, चार दिवसात एवढ्या कोटींचा आकडा पार, RRR चा रेकॉर्ड मोडणार?