‘माझ्या जीवाला धोका आहे’; प्रसिद्ध गायिकेच्या फेसबुक पोस्टने उडाली खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे (Singer Vaishali Bhaisane-Mhade) सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे माध्यमात चर्चेत आहेत. वैशाली यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भात दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वैशाली यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. २ दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे’. वैशाली यांच्या या पोस्टनंतर अनेकजण त्यावर कमेंट करत काळजी घेण्यास सांगत आहेत. तसेच काहीजण पोलिसांची मदत घेण्याचाही सल्ला देत आहेत.

वैशाली भैसने-माडे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी २००८ मध्ये ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप’च्या विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमामुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी हिंदीतील सारेगमपम ///या शोमध्येही सहभाग घेतला. तिथेही आपल्या आवाजाची जादू दाखवत त्या शोच्या विजेत्या बनल्या.

https://www.facebook.com/vaishalimadeofficialpage/posts/494981131987615

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे गाणं वैशाली यांनी गायलं. या गाण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तसेच ‘कलंक’ या चित्रपटातील ‘घर मोहे परदेसिया’ हे गाणंही त्यांनी गायलं आहे. याशिवाय त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या शोच्या दुसऱ्या पर्वातही दिसल्या होत्या. आपल्या गायनाच्या जोरावर वैशाली यांनी संगीतक्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली.

दरम्यान, वैशाली भैसने-माडे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते. यादरम्यान आता त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणात कोणता राजकीय अँगल आहे की व्यक्तिगत हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या :
भन्नाट लव्ह स्टोरी: दोन मित्रांच्या बायका पडल्या एकमेकांच्या प्रेमात, नंतर नवऱ्यांना घटस्फोट देऊन केले लग्न
अखेर वडिलांना दिलेलं ‘ते’ वचन केलं पुर्ण, नागार्जुनने १०८० एकर वनभूमी घेतली ताब्यात
नागिन ६ चे कलाकार घेतात तब्बल इतके मानधन, बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाश आहे दुसऱ्या क्रमांकावर