मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा हा राजकारणातील चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले होते त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे.
राज ठाकरे जाहीर सभेत म्हणाले होते, जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकारणात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. यावर अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपली मते मांडली. आणि आता या प्रकरणात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहभाग नोंदवला आहे.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शंकर महादेवन हे उत्कृष्ट गायक आहेत तसेच ते नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांनी त्यांच्या अनेक गाण्यातून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तसेच ते नेहमी आपल्या गाण्यात नवीन गोष्टी वाढवता असतात.
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर शंकर महादेवन यांनी ‘ब्रेथलेस हनुमान चालीसा’ गाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्यासाठी कठीण असला तरी पण त्यांनी यापूर्वी अनेक गाण्यात हा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी देखील झाला.
शंकर महादेवन यांनी क्रु अॅपद्वारे हि मोठी घोषणा केली आहे. शंकर महादेवन या निर्णयावर बोलतांना म्हणाले, मला हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. त्यामुळे मला फार आनंद होत आहे. हे गाणे गतांना या गाण्याचा वेग खूप जास्त असणार आहे. तसेच हे खूप अवघड आहे पण अशक्य नाही.
शंकर महादेवन यांच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावर सध्या या ‘ब्रेथलेस हनुमान चालीसा’ची चर्चा होतांना दिसत आहे. तसेच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत अजून कोणता निर्णय झाला नाही. त्यामुळे चाहतावर्ग उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
तीन वेळा पतीला विष देण्याचा केला प्रयत्न, तरीही बचावला पती, जीवावर उठलेल्या बायकोला अटक
टिकली लावल्यामुळे महिलेसोबत घडला भयानक प्रकार; पोलिस कर्मचाऱ्याने दिली जीवे मारण्याची धमकी
अल्लु अर्जूनचा चाहत्यांना धक्का, पोलिसांनी अल्लु अर्जूनला अडवून केली मोठी कारवाई