Share

Urvashi Rautela: २ बायका ४ मुलं असलेल्या सिंगरने उर्वशी रौतेलालं केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली, असा निर्णय…

Urvashi Rautela

Urvashi Rautela, Propose, Culture, Egyptian/ बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. उर्वशीलाही अनेक ठिकाणांहून लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीला विचारण्यात आले की तिला लग्नाबद्दल काही विचित्र प्रस्ताव आला आहे का? तर त्याला उत्तर देताना तिने सांगितले की, तिला एका इजिप्शियन गायकाने प्रपोज केले होते.

मात्र उर्वशीने त्या गायकाचा प्रस्ताव नाकारला कारण त्याचे आधी २ लग्न झाले होते आणि तो ४ मुलांची बाप होता. तसेच भारत आणि इजिप्तच्या संस्कृतीतही खूप फरक आहे. उर्वशीने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत लोक तिला कसे प्रपोज करत आहेत याबद्दल खुलेपणाने बोलले आहे.

ती म्हणाला की, मला खूप प्रस्ताव येत आहेत. एक प्रस्ताव असा देखील होता ज्यामध्ये आपल्या आणि त्यांच्या संस्कृतींमध्ये खूप फरक आहे. प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा आणि कुटुंबाचाही विचार केला पाहिजे. विशेषत: स्त्रियांना याची काळजी घ्यावी लागते कारण त्यांचे जीवन इतके सोपे नसते.

उर्वशीने सांगितले की, ती या इजिप्शियन गायकाला भेटली होती ज्याने दुबईमध्ये प्रपोज केले होते. ती म्हणाली, ‘हो, तो इजिप्शियन गायक आहे आणि त्याला आधीच २ बायका आणि ४ मुले आहेत. मला असा निर्णय घ्यायचा नव्हता की मला लग्न करून इतके लांब राहावे लागेल. मात्र, उर्वशीने तिला प्रपोज करणाऱ्या इजिप्शियन गायकाचे नाव सांगितले नाही.

उर्वशीच्या एका चाहत्याने तिच्या मुलाखतीच्या व्हिडिओवर टिप्पणी करताना, गायकाचे नाव मोहम्मद रमजान असे ठेवले आहे, ज्यांच्यासोबत तिचा एक म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज झाला आहे. उर्वशी सोशल मिडीयावर सक्रीय असलेली पाहायला मिळते. तसेच जगभरात तिचे करोडो चाहते आपल्याला पाहायला मिळतील.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, उर्वशी रौतेलाने २०१३ मध्ये ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली ज्यामध्ये तिच्यासोबत सनी देओल आणि अमृता राव मुख्य भूमिकेत होते. उर्वशी लवकरच रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय शेक्सपियरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकावर आधारित ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटातही ती काम करत आहे. याशिवाय ती थिरुत्तू पायले २ या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील तो व्हिडीओ झाला लीक, हॉट अवतार पाहून तुम्हालाही फुटेल घाम
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
PHOTO: उर्वशी रौतेलाने पिंक फ्लोरल बिकीनीवर सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, चाहते म्हणाले, ठंड में आग..
मोदी करणार गुजरात टायटन्सला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now