Share

गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन

ke ke

काल प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक के.के याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. कोलकतामध्ये शो झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात आणण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके 53 वर्षांचे होते.

के.के यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गायक के.के यांचे कुटुंबीय कोलकाताला पोहोचले आहेत. के.के. यांचे शवविच्छेदन थोड्याच वेळात एस.एस.के.एम रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याच समजत आहे.

त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. के.के यांच्या मृत्यूनंतर धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. मिळालेल्या  माहितीनुसार, जेव्हा के.के रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. मात्र, या सर्व गोष्टी पोस्टमार्टमनंतरच उघड होतील.

दरम्यान, गायक के.के यांच्या निधनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत. के.के यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दुखापतीच्या खुणा आढळल्याची माहिती मिळत आहे.

यासाठी पोलिस आयोजक आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले आहेत.

दरम्यान, बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘तडप तडप के इस दिल से’ हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केकेचा कार्यक्रम होता. याची माहिती त्यांनी स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर दिली होती.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”

इतर आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now