singer Chinmayi Shripada share photo with baby | साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा सध्या चर्चेत आहे. सध्या ती आई झाल्याचा आनंद घेत आहे. या वर्षी जूनमध्ये चिन्मयीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. चिन्मयी आई झाल्याच्या बातमीने चाहतेही प्रचंड खुश झाले होते. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.
गायिकेने सरोगसीद्वारे मुलांना जन्म दिल्याचा दावाही यूजर्स करू लागले. आता चिन्मयी श्रीपादने एक व्हिडिओ पोस्ट करून अशा लोकांना प्रत्युत्तर दिले आहे. खरे तर असे झाले की, चिन्मयी जुळ्या मुलांची आई झाल्यापासून लोक तिच्या प्रसूती आणि गर्भधारणा याविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते.
अशा लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी चिन्मयीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा बेबी बंप दाखवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच चिन्मयीने सरोगसीच्या माध्यमातून आई बनण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला. गायकाने स्वतःचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने गरोदरपणातील फोटो का नाही शेअर केला हे सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये चिन्मयी म्हणताना दिसत आहे, मी हा ३२ आठवड्यांचा प्रेग्नेंसीचा फोटो पोस्ट केला आहे कारण मला जास्त फोटो काढायला आवडत नव्हते. मी युट्यूब चॅनलवर सांगितले आहे की मला गर्भपातानंतर निरोगी गर्भधारणा हवी होती. ३२ आठवड्यांनंतर मी घाबरले होते.
तसेच पुढे ती म्हणाली की, मी डबिंग आणि रेकॉर्डिंग करत होते. तसेच लोकांना फोटो न काढण्याची विनंती करत होती. मला ते खाजगी ठेवायचे होते. तसेच मीडियातील फोटोग्राफर्सने सुद्धा ते खाजगीच ठेवले त्याबद्दल त्यांचे खुप खुप धन्यवाद. मला काही गोष्टी खाजगीच ठेवायच्या असतात. त्यामुळे मी फोटो न काढण्याची विनंती करत होती.
चिन्मयीने असेही म्हटले की, स्त्री गर्भवती कशी झाली याने काही फरक पडतो का? सरोगसी, आयव्हीएफ, नॉर्मल किंवा सिझेरियन डिलिव्हरी याद्वारे स्त्री आई झाली याचा विचार नाही केला पाहिजे. आई ही आई असते. म्हणूनच माझ्या गर्भधारणेबद्दल लोक काय विचार करतात याची मला अजिबात पर्वा नाही?
तसेच चिन्मयी श्रीपादने तिच्या जुळ्या मुलांचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये ती मुलांना स्तनपान करताना दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, एकाचवेळी दोघांना भरवणं हे असं असतं. ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण माझ्या पाठीचं आणि खांद्याचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. श्रवास आणि द्रीपदा अशा त्या मुलांची नावे आहे.
महत्वाच्या बातम्या-
Sarpanch : ग्रामस्थांनी थकबाकी भरावी यासाठी सरपंचाची भन्नाट शक्कल, दिवाळीनिमित्त आणली ‘ही’ खास योजना
MS Dhoni : मला वर्ल्डकपमध्ये घेतलं नाहीये त्यामुळे.., सामन्यापुर्वीच धोनीचे हैराण करणारे वक्तव्य, चाहतेही भावूक