Share

…तेव्हापासून राज माझ्यामागे लागला; शर्मिला ठाकरेंनी सांगीतली लव्हस्टोरी, वाचून चकीत व्हाल

सध्या महाराष्ट्र राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणापासून महाराष्ट्रातील राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

राज ठाकरे यांच्यासंदर्भात रोज काहीना काही बातम्या समोर येत आहेत. अशातच राज यांच्या प्रेमकहाणीबद्दल देखील बोलले जात आहे. राज यांची प्रेमकहाणी नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हांला राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या प्रेमकहाणी बद्दल काही माहिती देणार आहोत.

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात मिस्टर अँड मिसेस ठाकरे यांनी आपली प्रेमकहाणी सांगितली आहे. यावेळी दोघांनीही दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी शर्मीला ठाकूर यांनी सांगितले की, शिरीष पारकरने आमच्या दोघांची ओळख करून दिली होती. तेव्हापासून राज माझ्या मागे होते.

त्यांनी सांगितले की, मी रुपारेल कॉलेजमधून पास झाल्यानंतर नोकरी करत होते. त्यावेळी रविवारी मित्रमैत्रिणी भेटतात तसे आम्ही भेटायला गेलो होतो, तेव्हा राज त्याच्या मित्रांसोबत रूपारेलमध्येच होता. त्यावेळी शिरीष पारकर त्याच्यासोबत होता. शिरीष पारकरनेच आमची ओळख करून दिली होती. तेव्हापासून राज माझ्या मागे लागला.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ओळख झाल्यानंतर पुढे आम्ही एकमेकांना लॅन्डलाईनवर फोन करायचो, बोलायचो. आमची मैत्री प्रेमात झाली. पुढं आमचं लग्न झालं, आम्ही तेव्हा वयाने लहान होतो. जेव्हा अमित झाला, तेव्हाचा फोटो पाहिला तर त्यात राज फारच लहान दिसतात.

तसेच लग्नाबद्दल सांगताना शर्मिला म्हणाल्या, आमच्या लग्नाला घरातून कोणाचाच विरोध नव्हता. बाळासाहेब, माझे वडील आणि मोहन वाघ चांगले मित्र होते. बाळासाहेब जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी माझ्या बाबांसाठी हॅजलब्लेड कॅमेरा देखील आणला होता. त्यांची फार घट्ट मैत्री होती.

शिवाय राज यांनी बहीण माझी चांगली मैत्रीण होती, त्यामुळे आधीपासूनच सगळ्या ओळखी असल्याने लग्नाला कोणाचा विरोध झाला नाही. राज ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांच्याबाबत बोलताना म्हंटले की, शर्मिला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे, आणि तिचे बाबा दरवर्षी मला तू किती वयाचा झाला आणि ती किती असं गमतीने विचारायचे.

इतर

Join WhatsApp

Join Now